अलिकडच्या काळात अनेक महिलांमध्ये प्रसूतीनंतर पोस्टपार्टम डिप्रेशनची समस्या वाढत आहे. मुलांच्या जन्मानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक बदल होतात. त्याचे अनेक प्रकारचे नवीन अनुभव त्यांना येत असतात. मात्र काही वेळा महिलांसाठी ही चिंतेची कारण बनतात. बाळाच्या जन्मानंतर बाळाची जी आई असते ती नैराश्यातून जाते, त्यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन असे म्हणतात.
बाळाच्या जन्मानंतर महिलांना बालसंगोपन करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावेळी महिलांमध्ये शारिरीक आणि मानसिक बदल होतात. त्यामुळे हा आजार उद्धभवतो. पोस्टपार्टम डिप्रेशन हा एक गंभीर मानसिक आजार(illness) आहे. या आजाराला मानसोपचाराची गरज असते, कारण त्यामुळे बाळाच्या जिवाला धोका होण्याची शक्यता असते. बाळाला जन्म दिल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी साधाणपणे हा आजार होतो.
१) पोस्टपार्टम डिप्रेशनचे लक्षणे
झोपेच्या समस्या, भूक न लागणे, थकवा, सतत आळस येणे, उदास वाटणे, चिडचिड होणे, विनाकारण मूड स्विंग्स होणे, कशातही आनंद वाटत नाही, नकारात्मक विचार असणे, चिंता वाटणे, विनाकारण रडायला येणे.
२) पोस्टपार्टम डिप्रेशनची कारणे
कमी वयात आई (mother)होणे तसेच कोणाचाच मानसिक आधार नसल्याने बरेचदा महिलांना हा आजार होतो. काही वेळा महिलेला गरोदर राहण्याची इच्छा नसते मात्र घरच्यांच्या दबावापोटी त्या गरोदर राहतात. अश्या वेळी एकटेपणाची भावना येऊन डिप्रेशन येते. पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास सुद्धा मातेला हा गंभीर आजार होऊ शकतो. बाळतपणानंतर अनेक शारिरीक बदल होतात ज्यामुळे चिडचिड आणि नैराश्य येते. महत्वाचे म्हणजे हजारांमध्ये एकीला हा आजार होण्याची शक्यता असते.
३) पोस्टपार्टम डिप्रेशन झाल्यास काय करावे?
बाळतपणानंतर व्यायाम, (exercise,)मेडिटेशन आणि योगा करावा. ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. स्वत:च्या आणि बाळाच्या संगोपनावर जास्त लक्ष द्या. सकस आहार घ्या आणि फास्ट फूड पूर्णपणे टाळा. मद्य आणि धुम्रपान करू नका ज्यामुळे तुमचे शारीरिक आरोग्य चांगले राहील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अश्या वेळी महिलेला झोपेची खूप गरज असते. त्यामुळे आठ तास तरी बाळतपणानंतर मातेने झोप घ्यावी. इतरांनी सुद्धा तिच्या शरीरातील बदलांवर खिल्ली उडवू नये. त्यापेक्षा तिला जास्तीत जास्त मानसिक आधार द्यावा. कारण अश्या वेळी स्त्रियांना मानसिक आधाराची खूप गरज असते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.