Bharat Jadhav
बहुतेकजण चहा पिण्याआधी पाणी पितात, त्याला अनेकांना टोकलंही असेल.
चहा आधी पाणी पिण्यामागे कारण काय? असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर अनेकांकडे नाहीये.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी न पिता चहाचे प्यायल्याने आरोग्यासाठी घातक असतं. हे नुकसान टाळण्यासाठी चहा पिण्याआधी पाण्याचे सेवन केलं पाहिजे.
चहा पिण्याआधी पाण्याचं सेवन केल्यास दातांना फायदा होतो. चहामध्ये आढळणारा टॅनिन नावाचा पदार्थ दातांना चिकटत नाही आणि दात निरोगी होतात.
चहाचे सेवन केल्यानंतर अनेकांना पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. पण पाणी खाल्ल्यानंतर चहा प्यायल्यास पचनाच्या समस्या होण्याची शक्यता कमी असते.
चहा पिण्याआधी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवत नाहीत.
चहा पिण्याआधी पाणी सेवन केल्यास तुमचे शरीर हायड्रेट राहते.
येथे क्लिक करा