प्रत्येकाला बाहेर फिरायला खूप आवडते. बाहेरच्या सुंदर आणि मनमोहक वातावरणाचा अनुभव सर्वांना घ्यायचा असतो. याबरोबर रोजच्या जीवनातून सर्वच वैतागलेले असतात. काही नागरिकांना तर परदेशात जाण्याची इच्छा असते. परदेशात फिरायला जायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. म्हणून नागरिक वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात असतात. पण काही नागरिकांना असे वाटते की परदेशात फिरायला जाण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. म्हणून आज तुमच्यासाठी काही बजेटफ्रेंडली ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत.
परदेशात जाण्याचे तुमचे हे स्वप्न अगदी कमी बजेटमध्ये पूर्ण होणार आहे. याबरोबर तुम्ही अगदी बजेटफ्रेंडली ट्रिप एन्जॅाय करु शकता. तुम्हाला परदेशातील सुंदर ठिकाणांना एक्सप्लोर सुद्धा करता येणार आहे. परदेशात ट्रिप करण्याचा तुमचा अनुभव अगदी अविस्मरणीय ठरणार आहे. जर तुम्ही सुद्धा सुट्टीत मित्र-परिवारासोबत परदेशात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय तर या बातमीमध्ये तुमच्यासाठी काही बजेटफ्रेंटली ठिकाणे आहेत. याबरोबर तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न देखील पूर्ण होणार आहे. जाणून घेऊया बजेटफ्रेंडली ठिकाणांबद्दल सविस्तर माहिती.
नेपाळ
भारतीय पर्यटकांसाठी नेपाळ हा देश फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. या देशाला भेट देण्यासाठी नागरिकांना पार्सपोट, व्हिसा याची गरज लागणार नाहीये. याबरोबर या देशात पर्यटकांना हिमालयातील सुंदर नद्या, प्राचीन वारसा असलेली मंदिरे आणि आकर्षक अशी ठिकाणे पाहायला मिळणार आहे. पर्यटक अगदी कमी बजेटमध्ये नेपाळ देशाचा सुंदर अनुभव घेऊ शकता. याबरोबर पर्यटकांना नेपाळमधील अंकोर वाट, ताओल स्लेंग म्यूजियम यांसारखी अनेक प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळणार आहेत.
थायलँड
परदेशात फिरण्यासाठी थायलँड एक बजेटफ्रेंडली पर्याय आहे. या देशात फिरण्यासाठी पर्यटकांना जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीये. याबरोबर भारतीय पर्यटकांना थायलँडमधील सुंदर समुद्रकिनारे, आकर्षक अशी नाइटलाइफ आणि मंदिरे पाहायला मिळणार आहे. पर्यटक थायलँडमधील काही लोकप्रिय ठिकाणांना देखील भेट देऊ शकता. थायलँडमध्ये पर्यटकांना नवनवीन पदार्थांची चव घेता येणार आहे.
इंडोनेशिया
निसर्गप्रेमा पर्यटकांसाठी इंडोनेशिया सर्वात उत्तम ठिकाण आहे. पर्यटक या देशात रिसॅार्टस, समुद्रकिनारे, सुंदर निसर्ग यांचा अनुभव घेऊ शकता. पर्यटकांना या देशात फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. याबरोबर इंडानेशिया हे एक स्वस्त ठिकाण आहे. तुम्ही इंडोनेशिया ट्रिप तुमच्या निसर्ग प्रेमी मित्र-परिवारासोबत एन्जॅाय करु शकता.