Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

टोमॅटो खाल्ल्याने किडनी स्टोन होतो का? टोमॅटोमधील ऑक्सलेट, किडनी स्टोनची कारणे, पाण्याची कमतरता, जास्त मीठ आणि आहाराचा किडनी स्टोनवर होणारा परिणाम जाणून घ्या. किडनी स्टोन असल्यास टोमॅटो पूर्णपणे बंद करावा का, याबाबत तज्ज्ञांचे मत वाचा.
Kidney Stone
Kidney StoneAi Generated
Published On

भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटो हा रोजच्या वापरातील महत्त्वाचा पदार्थ आहे. भाजी, आमटी, डाळ, चटणीपासून ते सॅलडपर्यंत अनेक पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. काहीजण टोमॅटोची प्युरी तयार करून ती साठवूनही ठेवतात. मात्र किडनी स्टोनचा त्रास असलेल्या काही व्यक्ती टोमॅटो खाणं टाळतात.

टोमॅटो खाल्ल्यामुळे किडनीमध्ये स्टोन होतो, असा अनेकांचा समज आहे. विशेषतः टोमॅटोमध्ये ऑक्सलेट असतं. त्यामुळे ते खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो, असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास असलेल्या अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, टोमॅटो खाल्ल्याने खरंच किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो का?

Kidney Stone
Foods for heart health: हदयाच्या रक्तवाहिन्यांना चिकटलेलं कोलेस्ट्रॉल निघत नाहीये? डॉक्टरांनी सांगितलं हे 5 पदार्थ दररोज खा

एक वेबसाईटला माहिती देताना किम्स हॉस्पिटलचे डॉक्टर विश्वास एम. आर. यांनी सांगितलं की, प्रत्येक व्यक्तीने टोमॅटो खाणं पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते. किडनी स्टोन होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे केवळ टोमॅटोला किडनी स्टोनचे मुख्य कारण मानणं योग्य नाही.

टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो का?

टोमॅटो खाल्ल्याने थेट किडनीमध्ये स्टोन होतो, असं ठामपणे म्हणता येत नाही. किडनीमध्ये स्टोन तयार होण्याची अनेक कारणं असतात आणि किडनी स्टोनचे प्रकारही वेगवेगळे असतात. यामध्ये कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन हा किडनी स्टोनचा सर्वात सामान्य प्रकार मानला जातो. अशा प्रकारचा स्टोन असलेल्या व्यक्तींना डॉक्टर त्यांच्या परिस्थितीनुसार आहारातील ऑक्सलेट, मीठ, कॅल्शियम तसंच इतर पोषक घटकांच्या प्रमाणाकडे लक्ष देण्याचा सल्ला देऊ शकतात.

किडनीमध्ये स्टोन झाला आहे म्हणून प्रत्येकाने टोमॅटो पूर्णपणे बंद करावा, असं नाही. आहारातील बदल हे किडनी स्टोनचा प्रकार आणि व्यक्तीच्या तपासणीच्या अहवालानुसार ठरवले जातात.

कोणत्या कारणांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो?

शरीरात पाण्याची कमतरता

किडनी स्टोनपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर लघवीदरम्यान त्रास होऊ शकतो. अशावेळी लघवीमध्ये असलेले काही खनिज पदार्थ एकत्र येऊन त्यांचे छोटे क्रिस्टल तयार होऊ शकतात. पुढे याच क्रिस्टल्सचे रूपांतर किडनी स्टोनमध्ये होऊ शकतं.

Kidney Stone
Liver warning signs: लिव्हर खराब होण्यापूर्वी नखांवर दिसतात 3 संकेत; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

जास्त मीठ खाणं

आहारात मोठ्या प्रमाणात मीठ घेतल्यास लघवीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढू शकतं. काही व्यक्तींमध्ये यामुळे कॅल्शियमयुक्त किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे चिप्स, पॅकेज्ड फूड, इन्स्टंट नूडल्स, प्रोसेस्ड मीट आणि जास्त मीठ असलेले सॉस यांसारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं टाळणं योग्य ठरूतं.

ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ

कॅल्शियम ऑक्सलेट स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींना डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ काही पदार्थांचं सेवन कमी करण्याचा सल्ला देऊ शकतात. ऑक्सलेटचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. पालक, बीट, काही प्रकारचे नट्स आणि चॉकलेट यांसारख्या पदार्थांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी करण्याचा सल्ला काही रुग्णांना दिला जाऊ शकतो.

Kidney Stone
Liver health: लिव्हर कधीच होणार नाही खराब; डॉक्टरांनी सांगितलेले हे 2 ज्यूस सकाळी प्या, लगेच दिसेल फरक

किडनी स्टोन असल्यास टोमॅटो पूर्णपणे बंद करायचा का?

किडनीमध्ये स्टोन असल्यास स्वतःच्या मनाने टोमॅटो किंवा इतर कोणतीही भाजी पूर्णपणे आहारातून काढून टाकू नये. यासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीचा आहार हा प्रत्येकासाठी सारखा नसतो. स्टोन कोणत्या प्रकारचा आहे तसंच लघवी आणि रक्ताच्या तपासणीत काय समोर आलंय यावर आहारातील बदल अवलंबून असतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com