Surabhi Jayashree Jagdish
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहाराच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि सततचा मानसिक ताण यामुळे हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रक्रिया केलेले पदार्थ, संतृप्त आणि ट्रान्स फॅट तसंच अतिरिक्त साखरेचं जास्त सेवन केल्यास हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.
SAAOL Heart Center चे डॉ. बिमल छाजेर हृदयाच्या आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करण्यावर भर देतात. डॉक्टरांनी दिलेली अॅलोपॅथिक औषधे सुरू असतील तर ती स्वतःहून बंद न करता आहार आणि जीवनशैलीतील बदल डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं आवश्यक आहे. मात्र असे काही पदार्थ आहेत हे तुमच्या नसांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होतील.
डाळिंबामध्ये पॉलीफेनॉल्स आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करू शकतात. काही संशोधनानुसार, डाळिंबातील अनेक घटक रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तराच्या म्हणजेच एंडोथेलियमच्या कार्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
दालचिनीमध्ये विविध घटक आणि पॉलीफेनॉल्स असतात त्यामुळे मसाला म्हणून तिचा मर्यादित वापर आहारात करता येतो. काही अभ्यासांमध्ये दालचिनीचा रक्तातील साखर आणि रक्तातील चरबीच्या पातळीवर संभाव्य परिणाम दिसून आलाय.
लसणामध्ये अॅलिसिनसह अनेक सल्फरयुक्त घटक असतात, ज्यांचा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्याशी संबंध असल्याचं संशोधनातून आढळून आलं आहे. काही अभ्यासांमध्ये लसणाच्या सेवनामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीत किरकोळ सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दुधीमध्ये पाणी आणि काही पोषक घटक असतात त्यामुळे शिजवलेला दुधी आहाराचा भाग तुम्ही बनवू शकता. मात्र दुधीचा रस प्यायल्याने हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज कमी होतं, असं अनेक संशोधनातून समोर आलाय.
पिंपळाच्या पानांचा वापर काही पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये केला जातो. शिवाय चांगल्या रक्ताभिसरणासाठीही ही पानं फायदेशीर ठरू शकतात. पिंपळाची पाने उकळून प्यायल्याने हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज कमी होते किंवा कोलेस्ट्रॉलचा प्लाक कमी होण्यास मदत होते.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.