Surabhi Jayashree Jagdish
लिव्हर हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असून तो पोटाच्या उजव्या बाजूला, बरगड्यांच्या खाली असतो. शरीरात झालेल्या अनेक रासायनिक प्रक्रियांमध्ये लिव्हर महत्त्वाची भूमिका बजावतो. शरीरासाठी आवश्यक प्रोटीन तयार करण्यापासून ते पोषक घटकांवर प्रक्रिया करण्यापर्यंत अनेक कामं लिव्हर करतो.
आपण खाल्लेल्या अन्नातून मिळणाऱ्या पोषक घटकांवर प्रक्रिया करून त्यांचा शरीराला उपयोग होण्यासाठी लिव्हर मदत करतं. पित्त तयार करण्याचं कामही लिव्हर करतं, ज्यामुळे चरबीच्या पचनास मदत होते.
अति मद्यपान, फॅटी लिव्हरशी संबंधित समस्या, व्हायरल हेपेटायटिस आणि काही औषधांचा किंवा टॉक्सिक पदार्थांचा परिणाम यामुळे लिव्हरला नुकसान होऊ शकतं. लठ्ठपणा, मधुमेह आणि शरीरात अतिरिक्त चरबी साठण्यामुळेही लिव्हरवर ताण येऊ शकतो
लिव्हरच्या काही आजारांमध्ये नखांचा रंग, आकार किंवा त्यांची रचना बदललेली दिसू शकते. विशेषतः दीर्घकाळ चालणाऱ्या लिव्हरच्या आजारांमध्ये नखांमध्ये काही विशिष्ट बदल आढळू शकतात. त्यामुळे नखांमध्ये अचानक किंवा सातत्याने जाणवणारे असामान्य बदल दुर्लक्षित करू नयेत.
Terry’s nails या स्थितीत नखांचा बहुतांश भाग पांढरा किंवा फिकट दिसतो आणि नखांच्या टोकाजवळ गुलाबी किंवा लालसर पट्टी दिसू शकते. हा बदल सिरोसिससह काही लिव्हरच्या आजारांमध्ये आढळू शकतो.
Clubbing मध्ये बोटांच्या टोकांचा आकार वाढतो आणि नखं अधिक गोलाकार आणि बाहेरच्या दिशेने वाकलेली दिसतात. काही लिव्हरच्या आजारांमध्ये हा बदल दिसू शकतो. बोटांच्या टोकांचा आकार बदलत असल्याचं जाणवल्यास त्याची वैद्यकीय तपासणी करून घ्या.
Spoon nails किंवा koilonychia मध्ये नखं पातळ होऊन त्यांच्या मध्यभागी चमच्यासारखा खोलगटपणा दिसतो आणि कडा वरच्या दिशेने वाकतात. हा बदल लोहाच्या कमतरतेमध्ये अधिक सामान्यपणे दिसतो. परंतु काही लिव्हरशी संबंधित स्थितींमध्येही तो आढळू शकतो.