
दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळीत घरातील देवदेवतांची पूजा केली जाते. गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचे पूजन करतात. दरम्यान, या दिवशी घराघरात दिवे लावतात. देवासाठी छान नैवेद्य तयार करतात. असं म्हणतात ज्या घरात स्वच्छता आणि सकारात्मकता असते त्याच घरात देवी लक्ष्मी वास करते. दरम्यान, प्रत्येक चांगल्या कामापूर्वी गणपती बाप्पाचे पूजन करतात. त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाासाठी त्याच्या आवडीचे मोदक बनवू शकतात.
बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवताना मनात नेहमी श्रद्धा ठेवा. त्यामुळे मोदक आणखीनच छान होती. तुम्ही घरी बेसन आणि तूपापासून अवघ्या १० मिनिटांत मोदक बनवू शकतात. मोदक बनवण्याची सोपी रेसिपी वाचा.
साहित्य
२-३ चमचा तूप, बेसन, साखर, मलाई असलेले दूध, वेलची पावडर, काजू-बदाम, नारळ पावडर, कंडेंस्ड मिल्क, फूड कलर
रेसिपी
सर्वात आधी पॅनमध्ये तुम्ही तूप टाका. त्यात बेसन पीठ टाकून सतत ढवळत राहा. बेसनाचा रंगा बदलेपर्यंत ते हलवत राहा. बेसनाचा कलर बदलायला लागला की त्याचा सुगंध घरभर पसरेल. यानंतर बेसनात साखर आणि दूध टाका.
हे मिश्रण सतत हलवत राहा. हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. त्यातील सर्व पाणी मिक्स व्हायला हवे. गॅस बंद केल्यानंतर त्यात वेलची पावडर टाका. यानंतर तुम्हाला हवा तो फ्लेवर टाका. यानंतर मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
मोदकाच्या आतील स्टफिंग बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये काजू बदाम, नारळ पावडर, वेलची पावडर टाका. या मिश्रणात कंडेस्ड मिल्क टाका. कंडेस्ड मिल्क टाकल्यानंतर मिश्रण थोडं घट्ट होतं.
यानंतर सर्वात आधी मोदकाचे मोल्ड घ्या. त्याला ग्रीस लावा. त्यावर तुम्ही पीठाचे मिश्रण लावा. त्यामध्ये आत स्टफिंग भरा. यानंतर ते मोल्ड बंद करा. थोड्या वेळाने मोदक बाहेर काढा. यानंतर १० मिनिटांत तुमचे मोदक तयार झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.