Shreya Maskar
दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट रताळ्याचे गुलाबजाम बनवा. युनिक रेसिपी लिहून घ्या. पाहुण्यांना पदार्थ खुप आवडेल.
रताळ्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी साखर, वेलची पूड, उकडलेले रताळे, ड्रायफ्रूट आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
रताळ्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वप्रथम रताळी उकडवून घ्या. त्यानंतर त्याची साल काढून कुस्करून घ्या.
रताळ्यात दूध पावडर घालून कणिक मळा. कणकेचे छोटे गोळे करून गुलाबजाम वळून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात गुलाबजाम सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. गुलाबजाम जळणार नाही याची काळजी घ्या.
एका पॅनमध्ये पाणी आणि साखर मिक्स करून एकतारी पाक तयार करा. त्यात वेलची पूड टाकून छान मिक्स करा.
तळलेले गुलाबजाम गरम पाकात घालून छान मुरण्यासाठी ठेवा. गुलाबजाम मुरल्यानंतर त्यावर ड्रायफ्रूट्सचे काप टाका.
गुलाबजाम थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये 30 मिनिटे ठेवून द्या. त्यानंतर थंडगार गुलाबजामचा आस्वाद घ्या.