Peanut Chutney Recipe : नाश्त्याला बनवा शेंगदाण्याची झणझणीत ओली चटणी; डोसा,वडा,इडलीची चव वाढवेल

Shreya Maskar

सकाळचा नाश्ता

सकाळी नाश्त्याला चटपटीत खावेसे वाटत असेल तर शेंगदाण्याची ओली चटणी बनवून ठेवा. डोसा, वडा, इडली, पराठा यांसोबत ही चटणी स्वादिष्ट लागले.

Peanut Chutney | yandex

शेंगदाण्याची ओली चटणी

सकाळच्या नाश्त्याची रंगत वाढवण्यासाठी शेंगदाण्याची ओली चटणी बनवा. डोसा,वडा,इडलीसोबत चटणीचा आस्वाद घ्या.

Peanut Chutney | yandex

साहित्य

शेंगदाण्याची ओली चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या, हिरवी मिरची, काळी मिरी, जिरे, चिंच, साखर, मीठ, कोथिंबीर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Peanut Chutney | yandex

शेंगदाणे

शेंगदाण्याची ओली चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर पॅन गरम करून शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या घालून भाजून घ्या. शेंगदाणे जळणार नाही याची काळजी घ्या.

Peanuts | yandex

लाल सुक्या मिरच्या

मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या, हिरवी मिरची, काळी मिरी, जिरे, चिंच, चवीनुसार साखर - मीठ आणि कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा.

Red dried chilies | yandex

पाणी

चटणी जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. त्याप्रमाणे पाणी मिक्सरमधील मिश्रणात मिक्स करा.

Water | yandex

काजू

तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीत थोडी चव वाढवण्यासाठी काजूची पेस्ट देखील टाकू शकता. जेणेकरून लहान मुलं देखील आवडीने खातील.

Cashews | yandex

स्टोर करा

शेंगदाण्याची ओली चटणी हवाबंद डब्यात स्टोर करा. जेणेकरून ती एक आठवडा फ्रिजमध्ये चांगली टिकेल.

Peanut Chutney | yandex

NEXT : भाजणीचे पारंपरिक सीक्रेट जाणून घ्या, चकली होईल खमंग-कुरकुरीत

Bhajani Chakali Recipe | yandex
येथे क्लिक करा...