Shreya Maskar
दिवाळीचा फराळ बनवताना चकलीची भाजणी अनेकांना जमत नाही. त्यामुळे भाजणी बनवण्याची सिंपल ट्रिक फॉलो करा. यामुळे खुसखुशीत चकल्या बनतील.
भाजणी चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून पॅनमध्ये भाजून घ्या. तांदूळ करपणार नाही याची काळजी घ्या.
पॅनमध्ये चण्याची डाळ , उडीदाची डाळ , मुगाची डाळ, पोहे, साबुदाणे भाजून घ्या. सर्व डाळी सम प्रमाणात घ्या. म्हणजे पीठ नीट होईल.
दुसऱ्या पॅनमध्ये धणे आणि जिरे भाजून सर्व साहित्य एका बाऊलमध्ये मिक्स करा. आता तयार मिश्रण चांगले बारीक दळून घेऊन घ्या.
एका पॅनमध्ये दळलेले पीठ, मीठ, लाल तिखट, ओवा, पांढरे तीळ, तेल आणि पाणी टाकून एक उकड काढून घ्या.
मिश्रण ताटात काढून ग्लास किंवा वाटीच्या साहाय्याने दाबून घ्या. पीठ मऊ बनवा. पीठ जास्त गरम असेल त्यामुळे हात सांभाळून काम करा.
चकलीच्या साच्याला तेल लावून त्यात सर्व मिश्रण भरा. ताटात थोडे कोरडे पीठ टाकून चकल्या पाडून घ्या. चकलीचे पीठ चांगले मऊ बनवा.
पॅनमध्ये तेल गरम करून मंद आचेवर चकली खरपूस तळून घ्या. चकली कुरकुरीत होईल याची काळजी घ्या.