Besan Barfi Recipe: बेसनचे लाडू खाऊन कंटाळलात? दिवाळीत पाहुण्यांसाठी घरच्या घरी बनवा मऊसूत बेसन बर्फी, वाचा सोपी रेसिपी

Dhanshri Shintre

बेसन भाजून घ्या

कढईत तूप गरम करून त्यात बेसन घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत व सुगंध येईपर्यंत सतत ढवळत भाजा.

थंड होऊ द्या

बेसन नीट भाजल्यावर गॅस बंद करा आणि त्याला थोडावेळ थंड होऊ देऊन पुढील कृतीस तयार ठेवा.

पाक तयार करा

दुसऱ्या भांड्यात साखर व पाणी घालून मध्यम घट्टपणाचा पाक तयार करा, जास्त घट्ट होऊ देऊ नका.

बेसन साखरेच्या पाकात मिसळा

भाजलेलं बेसन साखरेच्या पाकात मिसळा आणि गॅसवर ठेवा, सतत ढवळत रहा जेणेकरून गोळा होणार नाही.

वेलची पूड घाला

मिश्रण घट्ट होताच त्यात वेलची पूड घालून नीट मिसळा, जेणेकरून सुगंध आणि चव सर्वत्र मिक्स होईल.

ताटात पसरवा

तयार मिश्रण तुप लावलेल्या ताटात ओतून समान पसरवा, वरून बदाम-पिस्त्याचे तुकडे घाला आणि हलक्या हाताने थोडे दाबा.

काप करा

मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवे त्या आकारात तुकडे करा आणि बर्फीचे सुंदर काप तयार करा.

NEXT: दिवाळीच्या फराळासाठी घरीच बनवा खुसखुशीत चिरोटे, वाचा स्टेप बाय स्टेप सोपी रेसिपी

येथे क्लिक करा