Diwali 2023 :दिवाळीसाठी घरच्या घरी बनवा पौष्टिक अन् शुगर फ्री बर्फी; पाहा रेसिपी

Diwali Recipe : घरच्या घरी शुगर फ्री बर्फी बनवा.
Diwali Sugar Free Barfi Recipe
Diwali Sugar Free Barfi RecipeSaam Tv
Published On

Diwali Sugar Free Barfi Recipe:

दिवाळीची सुरूवात झाली असून घराघरात फराळ बनवला जात आहे. दिवाळीत लाडू, करंजी, पेढे, बर्फी असे गोडाचे पदार्थ केले जातात. परंतु या सर्व पदार्थांने शुगर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सणासुदीला खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यायचे असते. त्यामुळे शुगर फ्री मिठाई घरच्या घरी बनवा.

सणासुदीच्या काळात आपण खूप जास्त गोड खातो. परंतु डायबिटिजच्या लोकांसाठी जास्त गोड खालल्याने शुगर वाढू शकते. त्याचसोबत शुगर फ्री मिठाई ही पौष्टिक असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शुगर फ्री बर्फी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साम्रगी

  • काजू

  • बदाम

  • अक्रोड

  • सुर्यफुलाच्या बिया

  • भोपळ्याच्या बिया

  • जवस

  • पांढरे तीळ

  • खजूर दूध

Diwali Sugar Free Barfi Recipe
Yoga For Hair : केसगळती वाढीसाठी अन् थांबवण्यासाठी ही 5 योगासने उपयुक्त आहेत

कृती

  • सर्वप्रथम खजुरातील बिया काढून टाका. त्यानंतर खजूर दुधात ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा.

  • आता तव्यावर बदाम, काजू, अक्रोड भाजून घ्या. त्यानंतर सुर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया १० मिनिटे भाजून घ्या.

  • भाजलेले सर्व घटक मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पावडर करा.

  • त्यानंतर भिजवून ठेवलेले खजूर मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित वाटून घ्या.

  • आता एका पातेल्यात तूप घाला. त्यात खजुराचे मिश्रण टाकून ते चार ते पाच मिनिटे शिजवून घ्या. खजुरातील पाणी पूर्णपणे जाईपर्यंत हे मिश्रण शिजवा.

  • आता त्यात सुका मेवा आणि सुर्यफूल, भोपळ्याच्या बियांची बारीक पावडर टाका.

  • सर्व मिश्रण काही वेळासाठी शिजवून घ्या. त्यात भाजलेले काळे आणि पांढरे तीळ घाला. त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करा.

  • मिश्रण खूप घट्ट होईल असे ठेवा.

  • त्यानंतर एका ताटात तूप लावून त्यावर बटर पेपर ठेवा. तयार झालेले मिश्रण थंड होण्यास ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर त्याला हलक्या आकारात कापून घ्या. त्यावर सजावटीसाठी चांदीची वर्ख लावा.

Diwali Sugar Free Barfi Recipe
Air Pollution And Diabetes : वायू प्रदूषणामुळे वाढतोय मधुमेहाचा धोका? या मार्गांनी येईल टाळता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com