Air Pollution And Diabetes : वायू प्रदूषणामुळे वाढतोय मधुमेहाचा धोका? या मार्गांनी येईल टाळता

Diabetes Tips : प्रदूषणाची वाढती पातळी आपले आयुष्य कमी होण्याचे कारण बनत आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
Air Pollution And Diabetes
Air Pollution And Diabetes Saam Tv
Published On

Air Pollution :

प्रदूषणाची वाढती पातळी आपले आयुष्य कमी होण्याचे कारण बनत आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हवेच्या प्रदूषणामुळे मधुमेहाचा धोका वाढतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासात पीएम 2.5 हे कारण असल्याचे आढळून आले आहे. जाणून घ्या काही टिप्स ज्यामुळे प्रदूषण आणि मधुमेह (Diabetes) दोन्ही टाळता येऊ शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल आपण सर्वच जागरूक आहोत. मुंबई (Mumbai) आणि आसपासच्या भागाचा AQI 400 च्या वर गेला आहे, ज्यामुळे आपल्या फुफ्फुसांना सर्वात जास्त नुकसान होत आहे. वायू प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे PM 2.5 कण, जे इतके लहान असतात की ते तुमच्या श्वासाद्वारे तुमच्या फुफ्फुसात प्रवेश करू शकतात आणि तुमच्या रक्तप्रवाहात देखील प्रवेश करू शकतात.

मुंबई आणि आसपासच्या भागात हवा ही धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. अशा स्थितीत होणाऱ्या आजारांमध्ये (Disease) आणखी नावाची भर पडली आहे. प्रदूषणामुळे टाइप 2 मधुमेह होऊ शकतो, असे एका अभ्यासात आढळून आले आहे.

Air Pollution And Diabetes
Air Pollution Affects Eye : वाढत्या प्रदूषणामुळे डोळे लाल होणे, सतत खाज सुटते; कशी घ्याल डोळ्यांची काळजी?

प्रदूषणावरील हा अभ्यास भारतातील दीर्घकालीन आजाराचा एक भाग आहे, जो मुंबईच्या लोकांवर करण्यात आला आहे. या अभ्यासात मधुमेह आणि वायू प्रदूषणाचा संबंध शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि वायू प्रदूषणामुळे मधुमेह होऊ शकतो, असे आढळून आले. चला जाणून घेऊया वाढत्या प्रदूषणामुळे मधुमेहाचा धोका कसा कमी करता येईल.

या पद्धतींनी तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता...

तुमच्या घरात HEPA फिल्टर असलेले एअर प्युरिफायर वापरा. हे तुमच्या घरातील हवेतील धुळीचे कण आणि प्रदूषक स्वच्छ करते, तुम्हाला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देते. दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील चरबी कमी होते आणि फुफ्फुसही मजबूत होतात. लठ्ठपणा हे मधुमेहाचे प्रमुख कारण आहे, त्यामुळे व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.

Air Pollution And Diabetes
Air Pollution: वायूप्रदूषण रोखण्यासाठी मुंबईतील सोने-चांदीच्या भट्टीवर कारवाई, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

प्रदूषणामुळे घरी बसूनच व्यायाम करा आणि बाहेर जाऊ नका, ओमेगा-3 फैटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन सी असलेले अन्न खा. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि व्हिटॅमिन सी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करते. शक्य तितक्या कमी बाहेर जा. गरज असेल तेव्हाच बाहेर जा आणि मास्क घाला. यामुळे तुमच्या शरीरातील पीएम 2.5 कमी होते आणि प्रदूषणामुळे होणारे नुकसानही कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com