Air Pollution: वायूप्रदूषण रोखण्यासाठी मुंबईतील सोने-चांदीच्या भट्टीवर कारवाई, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Air Pollution News: मुंबईत दिवसेंदिवस वायू प्रदुषण वाढताना दिसत आहे.
Air Pollution
Air PollutionSaam Tv
Published On

Air Pollution In Mumbai:

मुंबईतील सी विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित करण्याची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासोबतच आता व्यापक आरोग्य हित लक्षात घेता, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

या निर्देशांनुसार, नागरी वस्‍तीत सोने चांदी वितळवणा-या भट्टींवर (गलाई व्‍यवसाय) महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. ६ नोव्‍हेंबर सी विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील सोने-चांदी वितळवणाऱ्या म्हणजेच गलाई व्‍यावसायिकांचे एकूण ४ धुराडे (चिमणी) निष्‍कासित करण्‍यात आले आहेत. अशा प्रकारची कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे.

Air Pollution
Maharashtra Politics: छगन भुजबळांना समज द्यावी, परिस्थिती खराब होऊ शकते; शिंदे गटाचं अजित पवारांना आवाहन

सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोट्या स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्‍यातून निर्माण होणारा वायू चिमणी/ धुराडे याद्वारे हवेत सोडला जातो.

शास्‍त्रीय प्रक्रिया न करता सोडण्‍यात आलेल्‍या वायूमुळे मानवी आरोग्‍याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्‍यावसायिकांविरोधात सक्त कारवाई हाती घेतली आहे.

Air Pollution
Siddhivinayak Temple Trust : सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com