Diabetes : सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास प्या 'हा' रस, शुगर राहील कंट्रोल

Healthy Diet For Sugar Control : आजकाल मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी पौष्टिक पेय प्या.
Healthy Diet For Sugar Control
DiabetesSAAM TV
Published On

मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी नियमित डाएट फॉलो करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या. बाहेरचे अन्न पदार्थ टाळा. तसेच डायबिटीज रुग्णांची सोडा, फळांचे ज्यूस, चहा, कॉफी इत्यादी पेये पिऊ नये. तुम्ही याला ऑप्शन म्हणून सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पेय प्या.

आवळा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा बेस्ट ऑप्शन आहे. आवळ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आवळ्यामधील कार्बोहाइड्रेट पचनक्रिया सुरळीत करते आणि शरीरातील इन्सुलिन नियंत्रणात राहते. परिणामी मधुमेहाच्या रुग्णांना आराम मिळतो. हे पेय पौष्टिक बनवण्यासाठी त्यात मेथी आणि दालचिनी टाकू शकता.

नारळ पाणी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी नारळाचे पाणी उत्तम उपाय आहे. नियमित सकाळी नारळाचे पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया चांगली होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. नारळ पाणीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, खनिजे इत्यादी घटक जास्त प्रमाणात असतात. नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नारळ पाणी उपयुक्त ठरते.

Healthy Diet For Sugar Control
Kidney Health: किडनीला निरोगी ठेवायचंय? 'या' सवयींचं करा पालन, राहा निरोगी

ताक

मधुमेहाच्या रुग्णांनी ताक हे दुग्धजन्य पेय प्यावे. यामुळे कारण यात साखर नसते. जे की आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुम्हाला ताक अजून पौष्टिक बनवायचे असल्यास त्यात जिरे, आले, धणे इत्यादी मसाले टाका आणि प्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की, ताक कधीच जास्त थंड पिऊ नये.

जवसाचे पाणी

जवसाचे पाणी रोज सकाळी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच सकाळी भूक लागत नाही. फ्रेश वाटते. जवसमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthy Diet For Sugar Control
Health News: सावधान! चहा-कॉफीसोबत चुकूनही घेऊ नका ही ५ औषधं; अन्यथा आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com