Diabetes Day 2023 : हिवाळ्यात रक्तातील साखरेची पातळी का वाढते? कशी घ्याल काळजी

Diabetes Remedies : हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.
Diabetes Day 2023
Diabetes Day 2023Saam Tv
Published On

Home Remedies :

हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. अति थंडीमुळे ग्लुकोज आणि इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी थंडीच्या दिवसात काही गोष्टींची काळजी (Care) घेणे गरजेचे आहे, जेणेकरून रक्तातील साखरेच्या समस्येला सामोरे जावे लागेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मधुमेह हा एक जुनाट आजार (Disease) आहे ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढू लागते. मधुमेह पूर्णपणे नाहीसा करता येत नाही पण तो नियंत्रणात ठेवता येते. हिवाळ्यात अनेक मधुमेही रुग्णांची साखरेची पातळी वाढते. असे घडते कारण थंडीच्या मोसमात तुमची शारीरिक हालचाल खूप कमी असते आणि तुम्ही जास्त उष्मांक वापरता.

अशा स्थितीत हवामान बदलत असताना मधुमेही रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुमच्या घरात (Home) मधुमेहाचा रुग्ण असेल तर हिवाळ्यात त्यांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे हिवाळ्यात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अजिबात वाढणार नाही. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया-

Diabetes Day 2023
World Diabetes Day 2023 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या या वर्षाची थीम काय?

मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात साखरेची पातळी कमी करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करावा.

प्रतिकारशक्ती वाढवा -

हिवाळ्याच्या काळात लोक खूप आजारी पडतात त्यामुळे तणाव वाढतो आणि तणाव वाढला की रक्तातील साखरेची पातळी वाढते. हिवाळ्याच्या काळात तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आणि औषधे वेळेवर घेणे गरजेचे आहे. यासोबतच बॅक्टेरिया टाळण्यासाठी हॅड सॅनिटायझरचा वापर करा.

मेथीचे पाणी प्या -

भारतीय जेवणात मेथीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मेथी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरते. मेथीमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी 2 चमचे भिजवलेल्या मेथीच्या दाण्यांचे सेवन करावे. याशिवाय तुम्ही त्याची पावडर बनवून दूध किंवा पाण्यासोबत सेवन करू शकता.

Diabetes Day 2023
Air Pollution And Diabetes : वायू प्रदूषणामुळे वाढतोय मधुमेहाचा धोका? या मार्गांनी येईल टाळता

तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासत राहा -

हवामान बदलले की तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीतही चढ-उतार होत असतात. अशा स्थितीत, आपण वेळोवेळी आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणे महत्वाचे आहे.

तणाव मॅनेज करा -

कोर्टिसोल, ग्रोथ हार्मोन आणि अ‍ॅड्रेनालाईन यांसारख्या तणावाशी संबंधित हार्मोन्स कमी केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही अशा गोष्टी करणे महत्वाचे आहे ज्या करताना तुम्हाला आराम वाटतो.

आवळा सेवन करा -

आवळ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात. आवळा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ओळखला जातो आणि त्यात व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते. 2 चमचे आवळ्याची पेस्ट पाण्यात मिसळून रोज सकाळी प्या. यामुळे हिवाळ्यात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अजिबात वाढणार नाही.

Diabetes Day 2023
Diabetes Health : मधुमेहींनो, दिवाळीत गोड पदार्थ खाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच; शुगर राहिल नियंत्रणात

हात उबदार ठेवा -

हिवाळ्याच्या काळात मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे सतत हात थंड होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत, हातमोजे घालणे आणि हात उबदार ठेवणे महत्वाचे आहे. जेव्हा हात उबदार असतात तेव्हा रक्त योग्यरित्या वाहते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी तपासण्यापूर्वी हात गरम करा.

पायांची विशेष काळजी घ्या -

हिवाळ्याच्या काळात त्वचा कोरडी पडणे ही सामान्य गोष्ट आहे आणि या काळात अनेकांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. पण हे सर्व मधुमेही रुग्णांसोबत होत असेल तर त्यामुळे तुमच्या पायात जखमा आणि इन्फेक्शन होऊ शकते. अशा स्थितीत, हिवाळ्याच्या हंगामात आपण आपल्या पायांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात मोजे आणि चप्पल घाला, पायात मॉइश्चरायझर वापरा आणि जास्तीत जास्त पाणी प्या. जर तुम्हाला कोणतीही दुखापत झाली असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com