Constantly Yawning : सतत जांभई देताय? दुर्लक्ष करून नका, असू शकतो हा गंभीर आजार, जाणून घ्या

Daily Yawning Constantly : हिवाळ्याच्या मौसमात अनेकांना सातत्याने आळस येतो. काहीजण काही मिनिटा मिनिटाला जांभई देतात.
Constantly Yawning
Constantly YawningSaam Tv
Published On

Health News :

हिवाळ्याच्या मौसमात अनेकांना सातत्याने आळस येतो. काहीजण काही मिनिटा मिनिटाला जांभई देतात. अभ्यासानुसार, असे अनेक लोक (People) आहेत जे दिवसातून तब्बल 50-100 वेळा जांभई देतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशा लोकांमुळे त्यांच्या आसपास बसणाऱ्या लोकांच्या कामात अडथळा येण्याची शक्यता असते. तुम्हालाही नेहमी आळस (laziness) येत असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष्य करू नका. कारण हे मोठ्या आजारांचे लक्षण सुद्धा असू शकत. चला जाणून घेऊया जांभई येण्याची मुख्य कारणे कोणती -

Constantly Yawning
Health Tips : सकाळी उठल्याबरोबर शरीरात दिसतात ही लक्षणे? होऊ शकतो किडनीवर परिणाम

अपुरी झोप -

सातत्याने जांभई येण्याचे मुख्य कारण म्हणजे अपुरी झोप (Sleep). काही लोक रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात. यामुळे त्यांना शरीराला पुरेशी अशी झोप मिळत नाही. रात्री झोप न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी तुम्हाला खूप थकवा जाणवतो आणि तुम्हाला जास्त जांभई येते.

मधुमेह -

जास्त जांभई येणे हे हायपोग्लाइसेमियाचे प्रारंभिक लक्षण मानले जाते. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी झाल्यामुळे सुद्धा आपल्याला जांभई येते.

Constantly Yawning
Diwali Health Tips: फेस्टिव्हल सीझनमध्ये फिट राहायचे आहे? या गोष्टींची काळजी घ्या

निद्रानाश -

निद्रानाश हा झोपेशी संबंधित आजार आहे. यामध्ये माणसाला एकतर रात्री लवकर झोप लागत नाही, आणि जर लागली आणि काही कारणास्तव तो जागा झाला तर पुन्हा झोपणे त्याच्यासाठी कठीण होऊन बसते. रात्री झोप न मिळाल्याने लोकांना दिवसा जास्त झोप येऊ लागते त्यामुळे त्यांना खूप जांभई येते

हृदयविकाराचा धोका -

तुम्हाला जर सतत जांभई येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे हृदय विकाराचे सुद्धा लक्षण असू शकत. जास्त जांभई येणे हे हृदयाच्या आसपास रक्तस्त्राव किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील दर्शवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com