डेंग्यूचा खेळ पुढच्या वर्षी खल्लास, डेग्यूवर मिळाली जपानी संजीवनी

Dengue Vaccine India 2027: पावसाळा आला की सर्वांनाच भीती असते ती डेंग्यूची. मात्र आता यापासून सर्वांनाच मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. कारण डेंग्यूवर संजीवनी सापडलीय. काय आहे ही संजीवनी? डेंग्यूला रोखण्यारी ही लस कधी भारतात येणार? यावरचा हा रिपोर्ट....
DENGUE VACCINE QDENGA
DENGUE VACCINE QDENGAsaam tv
Published On

दरवर्षी पावसाळा आला आणि मच्छर दिसले की घरोघरी पसरणारी डेंग्यूची भीती आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांची घरोघरी जाऊन डेंग्यू रोखण्यासाठी होणारी धावपळ आता कायमची संपणार आहे. कारण, संपूर्ण भारताला डेंग्यूच्या तावडीतून सोडवण्यासाठी जपानची संजीवनी भारतात दाखल होतेय. केंद्र सरकारच्या CDSCO ने या व्हॅक्सीनला मंजुरी दिलीये. जपानी कंपनी ताकेदा आणि डॉ. रेड्डीज यांच्या सहकार्यातून QDENGA नावाची लस भारतीयांना मिळणारेय. ही लस कोण घेऊ शकतं आणि ती किती प्रभावी आहे पाहा,

डेंग्यूपासून मुक्तीची लस

2027 च्या सुरुवातीला भारतात मिळणार लस

4 ते 60 वयोगटासाठी पूर्णपणे सुरक्षित

2 डोस आणि 3 महिन्यांचे अंतर

डेंग्यूच्या चारही भयंकर स्ट्रेनवर प्रभावी

गंभीर लक्षणांपासून 90% पर्यंत बचाव

जापानी कंपनी ताकेदा आणि डॉ. रेड्डीजच्या २०२७ च्या पहिल्या ६ महिन्यांत ही लस बाजारात आणणारते लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी ही लस सुरक्षित असून या लसीचे दोन डोस हे ३ महिन्यांच्या अंतरानं घ्यायचे आहेत. आधी डेंग्यू झालेला असो वा नसो ही लस चारही प्रकारच्या डेंग्यू व्हायरसवर तितकीच प्रभावी ठरणारेय. या लसीनं गंभीर लक्षणं असली तरी ९० टक्क्यांपर्यंत सुरक्षा मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

दरवर्षी जगभरात तब्बल ४० कोटी लोकांना डेंग्यूची लागण होते, ज्यापैकी एकट्या भारतात लाखो लोकांना डेंग्यू होत असल्याचं समोर आलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी डेंग्यूमुळे जगभरात २० हजारांहून अधिक निष्पाप लोकांचा बळी जात असल्याची आकडेवारीही समोर आलीये. आपल्याच देशातील बॉलिवूडचे दिग्दर्शक यश चोप्रांनाही याच डेंग्यूमुळे प्राणाला मुकावं लागलं होतं. त्यामुळे ही व्हॅक्सिन भारतीयांसाठी थेट मृत्यूच्या दारातून घेऊन जाणाऱ्या डेंग्यूविरोधात लढणारी ढाल असल्याचं दिसतंय. पण लस आली तरी डासांपासून बचाव आणि परिसर स्वच्छ ठेवणंही तितकंच गरजेचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com