Daily Walking: दररोज फक्त इतकंच चाला, राहाल फिट अँड फाइन; ढिगभर फायदे आणि आयुष्यही वाढेल

Daily Walking Distance: चालणे हा खूप चांगला व्यायाम आहे. तुम्ही रोज चाललात तर तुम्हाला खूप फायदा होईल. रोज इतके अंतर पार केल्यावर तुम्ही एकदम फिट राहाल.
Daily Walking
Daily WalkingSaam tv
Published On
Summary

वजन कमी करण्यासाठी चालणे महत्त्वाचे

दररोज किती किमी चालणे गरजेचे

फिट राहण्यासाठी या टीप्स करा फॉलो

चालणे हा एक प्रकारचा व्यायाम असतो. चालण्यामुळे आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो. तुम्ही फीट राहता याचसोबत तुमचे वजनदेखील नियंत्रणात राहते. चालल्याने शरीर चांगले राहते. तुम्ही फीट राहण्यासाठी रोज किती चालले पाहिजे हे तुम्हाला माहितीये का? तुमच्या वजनावर आणि सवयींवर तुम्ही किती चालले पाहिजे हे ठरवता येते.

Daily Walking
Cervical Cancer: या लक्षणांना इग्नोर केल्यास वाढतो सर्वायकल कॅन्सरचा धोका; कोणत्या महिलांना असतो अधिक धोका?

दररोज इतके चालणे गरजेचे

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रोज ७००० ते १०,००० पाऊले चालणे गरजेचे आहे. म्हणजेच दररोज जवळपास ५ ते ८ किलोमीटर चालायला हवे. यामुळे तुमचे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते, याचसोबत पचनक्रिया चांगले काम करते. यामुळेच वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्ही आतापासून चालण्यास सुरुवात करत असाल तर दररोज ३००० ते ५००० पाऊले चालू शकतात. त्यानंत हळूहळू हे अंतर वाढवू शकतात.

वजन कमी करण्यासाठी चालणे (Daily Walking For Weight Loss)

जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी चालायचे असेल तर या गोष्टी करा.

कॅज्युअल चालणे(३ ते ४ किलोमीटर/तास)- जर तुम्ही अर्धा किंवा एका तासात ३-४ किलोमीटर अंतर चाललात तर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

जलद चालणे (५ ते ६ किमी प्रति तास)-जर तुम्ही ४५ ते ६० मिनिटात ५-६ किमी अंतर कापले तर तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.

पॉवर वॉकिंग (६-७ किमी प्रति तास)

जर तुम्ही एक तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळात ७ किमी अंतर पार केले तर त्यामुळे वजन कमी होऊ शकते.

Daily Walking
Fitness Diet: ओमलेट की उकडलेले अंडे? वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय कोणता?

फिटेनसाठी चालणे (Daily Walking For Fitness)

जर तुम्हाला फीट राहायचे असेल तर तुम्ही जॉगिंग, जलद चालावे. यामुळे तुमचे शरीर फीट राहण्यास मदत होते. दररोज ४-६ किमी वेगाने चालल्याने तुमचे पाय, शरीरयष्टी व्यवस्थित राहण्यास मदत होते.

Daily Walking
Walking Fitness Routine: रोज १०,००० पावलं चाललात तर होईल चमत्कार, शरीरात असा बदल घडेल की सगळ्यांनाच वाटेल आश्चर्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com