Cyber Security : सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा; हे १० पासवर्ड चुकूनही ठेवू नका

How To Hack Password : डिजिटल जगात बरीच कामे ही ऑनलाइन केली जातात. ऑनलाइन शॉपिंगपासून ते कॉलेज अॅडमिशनपर्यंत प्रत्येक गोष्टी तुम्हाला ऑनलाइन अकाउंट तयार करावे लागते. अकाउंट बनवताना तुम्ही कॉमन किंवा असे पासवर्ड वापरता ज्यामुळे आपला वैयक्तिक डेटा सहज हॅक होतो. ज्यामुळ त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते.
Cyber Security
Cyber SecuritySaam Tv
Published On

World Top 10 Worst Passwords:

सध्या संपूर्ण जग इंटरनेटच्या जाळ्यात अडकले आहे. इंटरनेटमुळे आपल्याला खूप फायदा होतो. परंतु, याच इंटरनेटमुळे आपल्यासोबत फ्रॉड देखील होऊ शकतो. बरेचदा सायबक क्राइम होण्यासाठी आपण अशा काही चुका करतो. ज्यामुळे गुन्हेगार सहज आपला डेटा हॅक करतो.

डिजिटल जगात बरीच कामे ही ऑनलाइन (Online) केली जातात. ऑनलाइन शॉपिंगपासून ते कॉलेज अॅडमिशनपर्यंत प्रत्येक गोष्टी तुम्हाला ऑनलाइन अकाउंट तयार करावे लागते. अकाउंट बनवताना तुम्ही कॉमन किंवा असे पासवर्ड वापरता ज्यामुळे आपला वैयक्तिक डेटा सहज हॅक (Hacked) होतो. ज्यामुळ त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते.

मागच्या काही काळापासून सायबर गुन्हांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सायबर गुन्हेगारांच्या तसेच वापरकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे सायबर गुन्हांच्या (Cyber Crime) या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आपल्या ट्विटर (एक्स)हँडलद्वारे जगातील १० सर्वात वाईट पासवर्डची यादी प्रसिद्धी केली आहे. तुम्ही देखील यापैकी कोणताही पासवर्ड ठेवत असाल तर तुमचा वैयक्तीक डेटा १०० टक्के हॅक झालाच म्हणून समजा. त्यासाठी लगेच पासवर्ड बदला.

Cyber Security
32 इंचाचा Smart TV खरेदी करा फक्त ५ हजारात, या मॉडेल्सवर मिळतोय बंपर Discount

1. हे पासवर्ड चुकूनही ठेवू नका.

  • १२३४५६

  • १२३४५६७८९

  • अतिथी

  • क्वार्टी

  • १२३४५६७८

  • 111111

  • १२३४५

  • col123456

  • १२३१२३

2. पासवर्ड बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • जर तुम्ही ऑनलाइन अकाउंसाठी पासवर्ड बनवत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

  • पासवर्ड तयार करताना एक कॅपिटल अक्षर असणे आवश्यक आहे.

  • याशिवाय किमान एक नंबर ठेवा

  • यामध्ये स्पेशल कॅरेक्टरही ठेवा.

  • तसेच अल्फा-न्युमरिकल पासवर्डला अधिक स्ट्रॉग पासवर्ड म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर पासवर्ड तयार करताना हेही लक्षात ठेवले पाहिजे की, जन्मतारीख, नाव, शहराचे नाव अशा कोणत्याही गोष्टी ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com