Credit Card Bill Hidden Charges : क्रेडिट कार्डधारकांनो, असं तुमच्यासोबतही घडलंय का? वेळीच व्हा सावध!

Credit Card Bill Charges : बऱ्याचदा अनेक महागड्या वस्तू आपण क्रेडिट कार्डवरून खरेदी करतो.
Credit Card Bill Hidden Charges
Credit Card Bill Hidden ChargesSaam Tv
Published On: 

Companies Charges Your Credit Card Bill : आजकाल खूप जास्त लोक खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरतात. बऱ्याचदा अनेक महागड्या वस्तू आपण क्रेडिट कार्डवरून खरेदी करतो. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या बिलवर भरपूर चार्जेस लावले जातात. ज्याबद्दल आपल्याला कल्पनाही नसते.

क्रेडिट कार्डच्या बिलवर अनेक चार्जेस लावले जातात. त्यात अ‍ॅडव्हान्स फी, लेट फी, रिवॉर्ड रिडेम्पशन फी, वार्षिक फी तसेच कंपन्यांकडून (Company) रेल्वे तिकीट, पेट्रोल खरेदीचे शुल्क आकारले जाते. नेहमी क्रेडिट कार्ड घेण्यापूर्वी या शुल्कांची माहिती तुम्हाला असायला हवी. क्रेडिट कार्ड कंपनीकडून वापरकर्त्यांवर अनेक प्रकारचे चार्जेस लावले जातात. यातील काही चार्जेसबद्दल वापरकर्त्यांना माहित नसतात. नकळत हे चार्जेस तुम्ही भरतात. त्यामुळे तुमचे बिल वाढले जाते.

Credit Card Bill Hidden Charges
Credit Card Score Mistake : क्रेडिट कार्ड वापरताय? या चुका करु नका, येऊ शकते आर्थिक संकट

कॅश अ‍ॅडव्हान्स फी

क्रेडिट कार्डमधून जेव्हा आपण एखादी रोख रक्कम एटीएमने काढतो तेव्हा क्रेडिट कार्ड कंपनी आकारलेली रक्कम घेते. सहसा ते 2.5 टक्के असते. या कारणास्तव, क्रेडिट कार्डमधून कधीही रोख रक्कम काढू नये. बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी रोख रक्कम थेट कर्ज असल्याचे समजते.

लेट फी

क्रेडिट कार्डचे बिल उशीराने भरल्याने कंपनीकडून चार्जेस (Charges) आकारले जाते. याची किंमच 100 ते 500 रुपयांपर्यंत असते. याशिवाय थकबाकीवर वेगळे व्याज द्यावे लागते. यामुळे तुमचे बिल वाढते.

Credit Card Bill Hidden Charges
Credit Card Tips : एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणे फायद्याचं की तोट्याचं?

वार्षिक शुल्क

प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनीकडून वार्षिक देखभाल (Maintainance) फी आकारली जाते. बहुतेक क्रेडिट कार्डमध्ये वार्षिक शुल्क एका वर्षासाठी माफ केले जाते. त्यानंतर पुढील वर्षांपासून हे शुल्क आकारले जाते.

रिवॉर्ड रिडेम्पशन फी

क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून होणाऱ्या खर्चावर रिवॉर्ड पॉईंट दिले जातात. काही क्रेडिट कार्ड (Credit Card) रिवॉर्डमध्ये प्रोडक्ट आणि वाउचर असल्यास रिवॉर्ड रिडेम्पशन फी आकारली जाते.

Credit Card Bill Hidden Charges
UPI Payment Using Credit Card : आता क्रेडिट कार्डनेही करता येणार UPI पेमेंट ! या 5 स्टेप फॉलो करा

रेल्वे आणि पेट्रोल खरेदीवर शुल्क

रेल्वे, मेट्रो आणि पेट्रोलच्या खरेदीवर अनेक वेळा क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून शुल्क आकारले जाते. यामुळे नेहमी ट्रेन तिकिट आणि पेट्रोल खरेदी करताना विशेष क्रेडिट कार्ड वापरावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com