साम टिव्ही ब्युरो
क्रेडिट कार्ड वापरण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये, तुम्हाला अनेक प्रकारच्या ऑफर, सूट आणि परतफेडीसाठी 50 दिवस व्याजाशिवाय मिळतात.
क्रेडिट कार्डचे जितके फायदे आहेत तितकेच काही तोटेही आहेत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असावे की नाही? याची माहिती असणे गरजेचे आहे.
एक क्रेडिट कार्ड मॅनेज करण्यासाठी तुम्हाला जास्त सोपं असतं.
एका क्रेडिट कार्डचे बिल तुम्ही वेळेवर सहज फेडू शकता.
वेळेवर बिले भरून तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकता. नवीन क्रेडिट कार्ड यूजर्ससाठी फक्त एक क्रेडिट कार्ड असणे चांगले आहे.
सर्व क्रेडिट कार्डमध्ये वेगवेगळे फीचर्स आणि फायदे असतात.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अनेक ऑफर्सचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवू शकता.
पण त्याचे बिल वेळेवर भरले नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.