सणासुदीला सुरुवात झाली आहे. गोडाधोडाच्या पदार्थांशिवाय सण अपूर्ण वाटतात. सणासुदीच्या काळात घरात विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. अशा स्थितीत कोणते तेल आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सणासुदीच्या (Festival) काळात बहुतेक लोक घरीच पदार्थ (Food) बनवतात. अशा स्थितीत चवीसोबत आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सणासुदीच्या काळात कोणते स्वयंपाक तेल (Oil) घरात वापरू नये. हे क्रिटिकेअर हॉस्पिटल, मुंबई येथील आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञ योगिता गोराडिया यांच्याकडून जाणून घेऊया. पोषणतज्ञ योगिता गरोडिया सांगतात की, स्वयंपाक करताना अनेकजण या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही ती म्हणजे स्वयंपाकाचे तेल. अशी अनेक तेल आहेत जी आपल्या आरोग्याला थेट हानी पोहोचवतात, चला जाणून घेऊया?
पाम तेल
पोषणतज्ज्ञ योगिता गोराडिया सांगतात की, पाम तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. सॅच्युरेटेड फॅट तुमचे LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल पातळी वाढवते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अधिक वाढतो. पाम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने लठ्ठपणा वाढण्याचीही शक्यता असते.
कॅनोल तेल
कॅनोल तेलामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अॅसिड असतात. कॅनोला तेलाच्या अतिवापरामुळे लठ्ठपणा, हृदयविकार आणि अल्झायमर सोबत जळजळ होऊ शकते.
मक्याचे तेल
इतर वनस्पती तेलांप्रमाणे, ओमेगा 6 फॅटी ऍसिड देखील कॉर्न ऑइलमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. कॉर्न ऑइलचा जास्त वापर केल्यास जळजळ होऊ शकते. त्यामुळे सणासुदीच्या काळात कॉर्न ऑइल जपून वापरा.
सोयाबीन तेल
अर्थात, सोयाबीन तेल आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु काही लोकांना या तेलाचे सेवन केल्याने ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. त्याच वेळी, जर तुम्ही कोणत्याही रोगासाठी औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच या तेलाचा आहारात समावेश करा.
त्यामुळे या सणासुदीच्या काळात चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. तुम्हालाही घरच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर हे स्वयंपाक तेल मर्यादित प्रमाणातच वापरा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.