Taak Benefits: उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सला टक्कर देणारं ताक; आरोग्यासाठी फारच गुणकारी

Buttermilk Benefits in Marathi: परंतु तूम्ही सतत कोल्ड्रिंक्स पीत असाल तर वेळीच थांबा. सतत कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्याऐवजी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता.
Taak AKA Buttermilk
Taak AKA ButtermilkSaam TV

Taak Pinyache Fayde

संपूर्ण महाराष्ट्रात होळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरी झाला. अशातच तुम्ही अनेकदा मोठ्या व्यक्तींच्या तोंडून असं नक्कीच ऐकलं असेल की, होळी पेटली आता उन्हाचा तडाखा वाढत जाणार. त्यातच नुकताच एप्रिल महिना सुरू झाला आहे. त्यामुळे बरेच पेयप्रेमी एप्रिल महिन्याचं स्वागत आईस्क्रीम, कोको कोला, मीरेंडा यांसारखे कोल्ड्रिंक्स पिऊन करतात.

या महिन्यापासून ऊन एवढं वाढत जातं की, प्रत्येकजण तहान भागवण्यासाठी पाणी कमी आणि कोल्ड्रिंकचं जास्त सेवन करतात. परंतु तूम्ही सतत कोल्ड्रिंक्स पीत असाल तर वेळीच थांबा. सतत कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्याऐवजी तुम्ही ताकाचे सेवन करू शकता.

Taak AKA Buttermilk
Health Tips: उन्हाळ्यात संत्री खाण्याचे फायदे

शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ताक हे एक उत्तम पेय मानलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसांत ताक प्यायल्याने तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतील. ताक हे तुमच्या शरीराची एनर्जी बूस्ट करण्यासाठी मदत करते. त्यामुळे नियमित ताकाचे सेवन केल्याने तुम्ही डीहायड्रेशन तसेच शरीरातील इतर आजारांपासून दूर राहाल.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :

अनेक लठ्ठ व्यक्ती आणखीन वजन वाढू नये म्हणून डेअरीचे प्रॉडक्ट वापरणे टाळतात. परंतु ताक हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. दुपारच्या जेवणानंतर ताकाचे सेवन केल्याने तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

Taak AKA Buttermilk
Health Tips: उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याचे तोटे

कफ पासून मुक्ती :

जर तुम्हाला कफदोष असेल तर ताकापेक्षा गुणकारी औषध कुठलंच नाही. कफपासून मुक्ती हवी असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी ताकाचे सेवन करावे. असं केल्याने तुमचा कफ पूर्णपणे नाहीसा होईल.

डीहायड्रेशनची समस्या :

ताक हे दह्यापासून बनले जाते. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी तसेच डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचवण्यासाठी मदत करतात. दह्याचं ताक बनवण्यासाठी तुम्हाला दह्यामध्ये पाणी, मीठ आणि चाट मसाला किंवा पुदिना मिसळवून प्राशन करायचे आहे. दररोज या पेयाच सेवन केल्याने तुम्ही डीहायड्रेशच्या समस्येपासून दूर राहाल.

Taak AKA Buttermilk
Cold Wave In Mumbai : मुंबईकरांना पुन्हा येणार गुलाबी थंडीचा अनुभव, किमान तापमान १५ अंशांनी खाली जाणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com