CNG कार वापरताय? फक्त सर्व्हिसिंग नाही, सिलिंडरची हायड्रो टेस्टही करा; जाणून घ्या कधी आणि कुठे कराल, किती खर्च येतो? जाणून घ्या

CNG Car Tips : CNG कारची सर्व्हिसिंग आणि इंजिन तपासणीसोबत सिलिंडरची सुरक्षितताही तपासणे महत्त्वाचे आहे.ही टेस्ट कधी, कुठे आणि कशी केली जाते, तसेच त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, जाणून घ्या.
CNG कार वापरताय? फक्त सर्व्हिसिंग नाही, सिलिंडरची हायड्रो टेस्टही करा; जाणून घ्या कधी आणि कुठे कराल, किती खर्च येतो? जाणून घ्या
CNG कार वापरताय? फक्त सर्व्हिसिंग नाही, सिलिंडरची हायड्रो टेस्टही करा; जाणून घ्या कधी आणि कुठे कराल, किती खर्च येतो? जाणून घ्याmeta ai
Published On

तुम्ही सीएनजी कार वापरताय? तर मग केवळ सर्व्हिसिंग किंवा इंजिनच्या चेक करून घेणेच महत्वाचे नाही, तर सीएनजी सिंलिंडर सुरक्षित आहे का, हे देखील तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा सिलिंडरमध्ये सीएनजी प्रचंड प्रेशरमध्ये भरलेले असते. त्यामुळे वेळोवेळी सिलिंडर चेक करणं अत्यावश्यक आहे. ती कशी कराल, तर त्याच्यासाठी हायड्रो टेस्ट करण्यात येते. या टेस्टमध्ये सिलिंडर किती सक्षम आहे, तो आणखी किती काळ टिकणार किंवा त्याची सध्याची अवस्था काय आहे, हे तपासून बघितलं जातं. जर तुम्ही सीएनजी कार चालवत असाल, तर सिलिंडरची टेस्ट कधी आणि कशी केली जाते, हे सोप्या शब्दांत समजून घ्या.

सीएनजी सिंलिंडर टेस्ट का महत्त्वाची असते?

सिंलिंडरमध्ये सीएनजीचा दबाव कायम असतो. सीएनजी जर जास्त वेळ सिंलिंडरमध्ये असेल तर त्याच्या मजबूतीवर त्याचा परिणाम होतो आणि लिकेज किंवा इतर प्रॉब्लेम सुरू होतो. असा सिलिंडर वापरण्यासााठी धोकादायक असतो.

या टेस्टला हायड्रो टेस्ट का म्हणतात?

या सिंलिंडरची तपासणी करताना पाण्याने यातील प्रेशर मोजले जाते. यामुळे या टेस्टला हायड्रो टेस्ट किंवा हायड्रोस्टेटिक टेस्ट म्हटले जाते. एकदा टेस्ट केल्यानंतर मार्किंग केली जाते यावर पुढची टेस्ट करण्याची तारीख लिहिलेली असते.

CNG कार वापरताय? फक्त सर्व्हिसिंग नाही, सिलिंडरची हायड्रो टेस्टही करा; जाणून घ्या कधी आणि कुठे कराल, किती खर्च येतो? जाणून घ्या
Bad cholesterol: फक्त 2 दिवस खा हा 1 ब्रेकफास्ट; खराब कोलेस्ट्रॉन निघून जाईल, हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी

कोणत्या ठिकाणी ही टेस्ट करावी?

ही टेस्ट कोणत्याही सामान्य गॅरेजमध्ये करता येत नाही. यासाठी अधिकृत टेस्टिंग सेंटरवर जाणेच योग्य आहे. तिथे सिंलिंडरला व्यवस्थित तपासून सिंलिंडरची सुरक्षा मजबूत केली जाते.

हायड्रो टेस्टिंगसाठी किती खर्च लागतो?

हायड्रो टेस्टिंगसाठी लागणारे पैसे हे वाहन, सेंटर आणि सिंलिंडरच्या प्रमाणे वेगवेगळे असते. साधारण या टेस्टची किंमत 1500 ते 3000 च्या मध्ये असते.

CNG कार वापरताय? फक्त सर्व्हिसिंग नाही, सिलिंडरची हायड्रो टेस्टही करा; जाणून घ्या कधी आणि कुठे कराल, किती खर्च येतो? जाणून घ्या
High Cholesterol Diet: नसांमध्ये साचलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल खेचून काढेल बाहेर; आहारात फक्त या 1 भाजीचा करा समावेश
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com