High cholesterol: औषधांशिवाय नियंत्रणात राहील कोलेस्ट्रॉल! हा डाएट प्लान करा फॉलो, रक्तवाहिन्यांमधील चरबी झटक्यात निघून जाईल

Natural cholesterol remedies: ३० नंतर वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा धोका कसा कमी करावा? मेथीचे पाणी, ओट्स, जवस, कडधान्यांचा आहार, कोलेस्ट्रॉलची सुरुवातीची लक्षणं, हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक उपाय आणि तज्ज्ञांनी सुचवलेल्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
High cholesterol
High cholesterolsaam tv
Published On

सध्या जवळपास ९० टक्के लोकांची जीवनशैली ही चुकीची आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बहुतांश लोकांचा दिवस खुर्चीवर बसूनच जातो. ऑफिसचं काम, घरातून काम करण्याची पद्धत आणि कमी झालेली शारीरिक हालचाल यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढतेय. त्यापैकी वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही सध्या वेगाने वाढणारी समस्या आहे. खास करून वयाच्या ३० वर्षांनंतर अनेकांमध्ये लिव्हरशी संबंधित त्रास आणि कोलेस्ट्रॉल वाढल्याची प्रकरणं अधिक दिसून येतायत.

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डॉक्टर गरजेनुसार तुम्हाला योग्य ती औषधं देतात. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आयुर्वेदात सांगितलेल्या काही नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास वाईट (LDL) कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

वयाच्या ३० नंतर कोलेस्ट्रॉल का ठरतं धोकादायक?

३० वर्षांनंतर शरीराचं मेटाबॉलिझम काही प्रमाणात कमी होऊ लागते. त्यातच अयोग्य आहार, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव असेल तर रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

High cholesterol
Jeera Water: दररोज सकाळी 30 दिवस जिऱ्याचं पाणी प्या; या 5 समस्यांपासून मिळेल आराम

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणं

कोलेस्ट्रॉल वाढलं तरी सुरुवातीला अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं जाणवत नाहीत. मात्र ही लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये-

  • सतत थकवा जाणवणं

  • छातीत दुखणं

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • चालताना धाप लागणं

  • पायांमध्ये वारंवार गोळे येणं

  • डोळ्यांच्या पापण्यांवर पिवळसर डाग किंवा गाठी दिसणं

आयुर्वेदानुसार कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

दिवसाची सुरुवात मेथीच्या पाण्याने करा

रात्री एक ग्लास पाण्यात मेथीचे दाणे भिजत ठेवा आणि त्यात लसणाची एक पाकळीही टाका. सकाळी हे पाणी गाळून प्या. या उपायामुळे रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि शरीरात नवीन कोलेस्ट्रॉल तयार होण्याची प्रक्रिया मंदावू शकते. तुम्हाला हवं असल्यास सकाळी लसणाची पाकळी हलकी भाजूनही खाऊ शकता.

नाश्त्यात ओट्स आणि जवसाचा समावेश करा

ओट्समध्ये असलेले बीटा-ग्लुकन हे फायबर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तर जवसामध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. या दोन्ही पदार्थांचा नाश्त्यात समावेश केल्यास हृदयावरील ताण कमी होण्यास आणि अतिरिक्त कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर टाकण्यास मदत मिळू शकते.

High cholesterol
High Cholesterol: दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या 5 बिया; नसांमधील खराब कोलेस्ट्रॉल झटक्यात वितळेल

आहारात राजमा आणि कडधान्यं यांचा समावेश करावा

राजमा, विविध प्रकारच्या डाळी आणि इतर कडधान्यांमध्ये भरपूर वनस्पतीजन्य प्रोटीन आणि फायबर असतं. हे घटक अन्नातील कोलेस्ट्रॉलचं शोषण कमी करण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे हृदयाचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठीही हे पदार्थ उपयुक्त ठरतात.

रिफाइंड तेलाचा वापर

वारंवार रिफाइंड तेलात बनवलेले पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शक्य तितका रिफाइंड तेलाचा वापर कमी करावा. त्याऐवजी संतुलित प्रमाणात आणि योग्य प्रकारचं खाद्यतेल वापरणं अधिक फायदेशीर ठरतं.

High cholesterol
High Cholesterol: या ठिकाणी वेदना होत असतील तर सावध व्हा; शरीर देतंय कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com