Chandra Grahan 2024 : या ५ राशीसाठी वर्षातले पहिले चंद्रग्रहण ठरेल लकी! होईल आर्थिक धनलाभ

Chandra Grahan 2024 Date : मार्च महिन्यात वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसणार आहे. पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला २५ मार्चला चंद्रग्रहण दिसणार आहे.
Chandra Grahan 2024
Chandra Grahan 2024 Saam Tv
Published On

Chandra Grahan 2024 Rashifal :

मार्च महिन्यात वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसणार आहे. पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला २५ मार्चला चंद्रग्रहण दिसणार आहे.

चंद्र आणि सूर्याच्यामध्ये पृथ्वी आल्यानंतर चंद्रग्रहण होते. या काळात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यंदा वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच २५ मार्चला असणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल. परंतु हे भारतात (India) दिसणार नाही.

२५ मार्चला हे चंद्रग्रहण सकाळी १०.४१ वाजता सुरु होईल तर दुपारी ३.०१ मिनिटांनी संपेल. २०२४ च्या पहिला चंद्रग्रहण आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड, बेल्जियम, नॉर्वे, स्वित्झर्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक या देशांमध्ये दिसणार आहे. आणि अंटार्क्टिकासारख्या शहरांमध्ये दिसेल. हे ग्रहण काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींना (Rashi) फायदा होईल.

Chandra Grahan 2024
Chandra Grahan 2024 : मार्च महिन्यात असणार वर्षातले पहिले चंद्रग्रहण, कधी आणि कुठे दिसणार? जाणून घ्या

1. मिथुन

या चंद्रग्रहणाचा मिथुन राशींना फायदा होणार आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. गुंतवणुदारांना फायदा (Benefits) होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवन सुखमय होईल. खर्च कमी करा. व्यवहारासाठी हा काळ अतिशय शुभ आहे.

Chandra Grahan 2024
Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे मीन राशीत संक्रमण! ३ राशींच्या लोकांचे भाग्य खुलणार, पडेल पैशांचा पाऊस

2. सिंह

नवीन घर खरेदी करु शकता. माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहिल. वैवाहिक जीवनात आनंद राहिल. नवीन कार्य सुरु करण्यासाठी ही वेळ शुभ आहे. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार कराल. आर्थिक स्थिती चांगली राहिल.

3. कन्या

या चंद्रग्रहणामुळे कामात यश मिळेल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करु शकता. व्यवसायासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. आर्थिक लाभ होईल. यावर्षी खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल.

Chandra Grahan 2024
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या 4 राशींसाठी हा आठवडा अडचणींचा; वाचा एका क्लिकवर साप्ताहिक भविष्य

4. वृश्चिक

चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. नवीन वाहन खरेदी करु शकता. व्यवहारासाठी हा वेळ उत्तम राहिल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.

5. धनु

गुंतवणुकीसाठी हा वेळ चांगला असेल. आर्थिक लाभ होईल पण खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. व्यापारीवर्गासाठी हा काळ लाभदायक ठरेल. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्यासाठी ही वेळ शुभ आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com