Chanakya Niti On Relationship: लग्नानंतरचा हा काळ धोकादायकच! नवविवाहितांनी नातं टिकवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

Husband Wife Relationship : लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात अनेक बदल घडतात. जर आपण एकमेकांना ओळखत नसू तर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात
Chanakya Niti On Relationship
Chanakya Niti On RelationshipSaam tv
Published On

Marriage Tips : लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्यात अनेक बदल घडतात. जर आपण एकमेकांना ओळखत नसू तर आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. एकमेकांच्या आवडी निवडीपासून ते इतर सगळ्याचं गोष्टी. प्रेम, विश्वास, जवळीक सगळं काही एकाच वेळी घडतं. पण काही काळानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कंटाळा जाणवू लागतो.

चाणक्य म्हणतात की, लग्नानंतरचा हा काळ जोडप्यांसाठी अधिक महत्त्वाचा आणि निर्णायक असू शकतो, कारण यावेळी आपण आपल्या काही गोष्टी सोडून नव्या आयुष्यात पदार्पण करतो. अशावेळी काही गोष्टींची आपल्याला चिड येते. त्यावेळी आपल्याला स्वत:वर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे असते. जाणून घेऊया नवविवाहित जोडप्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

Chanakya Niti On Relationship
Is Rice Good For Health : दररोज भात खाणे शरीरासाठी चांगले आहे का?

1. स्वतःवर नियंत्रण ठेवा

नातं (Relations) टिकवण्यासाठी ते जपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर त्यावर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे. आपल्या सवयी (Habits) पटकन बदलणे कठीण नाही त्या बदलण्यास काही काळ द्यावा लागतो.

2. वेळ काढणे आवश्यक

हनिमूननंतरही जोडप्याने एकमेकांसाठी वेळ (Time) काढणे खूप महत्वाचे आहे. नाहीतर नात्यात दूरावा येऊ शकतो. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा, त्याच्या आवडीच्या गोष्टी करा. त्याला सतत खुश ठेवा.

Chanakya Niti On Relationship
Famous Couple Spots in Mumbai : प्रेमीयुगुलांनो, एका दिवसात मुंबई फिरायची आहे? ही ठिकाणे आहेत बेस्ट !

3. हळूहळू बदल करा

लग्नानंतर तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांनुसार स्वतःला साचेबद्ध करावे लागते, हा काळ खूप कठीण आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या घरातून तुमच्या नवऱ्याच्या घरी येत असाल आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणता. सासू-सासरे यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही.

4. संवाद

अनेकदा जोडप्यांमध्ये बोलण्यासाठी विशिष्ट विषय नसतो, ज्यामुळे त्यांना कंटाळा येऊ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या ना कोणत्या विषयावर बोलायला हवे. कोणत्याही चित्रपट किंवा कामाच्या ठिकाणाशी संबंधित चर्चा करा. एकमेकांबद्दल जाणून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com