Chanakya Niti On Happy Life: तारुण्यात वेळीच हे काम निपटवा, आयुष्यभर मिळेल सुखच सुख

Success Mantra : तरुण वयात माणसांने काही गोष्टींचे पालन केले तर त्याचे आयुष्य अधिक सुखी होऊ शकते.
Chanakya Niti On Life
Chanakya Niti On LifeSaam Tv
Published On

Life Lesson : जन्माला आल्यानंतर काही वयानंतर प्रत्येकजण आपल्या आयुष्यात ध्येय ठरवतो. जीवनाला सार्थक करण्यासाठी माणसाने आपल्या जीवनात अशा गोष्टी केल्या पाहिजेत, ज्यामुळे त्याला जीवनात सुखद परिणाम मिळतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की, तरुण वयात माणसांने काही गोष्टींचे पालन केले तर त्याचे आयुष्य अधिक सुखी होऊ शकते. त्यासाठी माणसाने काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. चाणक्याने अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात केल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांना सतत आनंद आणि यश मिळत राहते.

Chanakya Niti On Life
Chanakya Niti Father Son Relation: मुलांच्या आणि वडिलांच्या नात्यात दूरावा येतोय? या गोष्टींची काळजी घ्या

1. धर्माचे पालन करा

चाणक्याच्या धोरणानुसार, व्यक्तीने प्रत्येक कार्य धर्माच्या अंतर्गत केले पाहिजे. धर्माअंतर्गत कार्य करणारी व्यक्ती कधीही दुःखी नसते. त्याच्या आयुष्यात समस्याही फार कमी काळासाठी (Time) येतात. धर्म माणसाला योग्य मार्गावर नेतो. धर्म माणसामध्ये सत्य आणि प्रामाणिकपणाची भावना आणतो.

Chanakya Niti On Life
Don't Eat Wheat For A Month : महिनाभर गव्हाचे पदार्थ खाऊच नका, शरीरात होतील हे बदल

2. पैशाची बचत करा

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने आपल्या आयुष्यात पैशाची खूप काळजी घेतली पाहिजे. पैसा खूप विचारपूर्वक खर्च करावा. तसेच, तुमचे ध्येय निश्चितपणे ठरवा. तुम्हाला किती पैसे जोडायचे आहेत आणि केव्हा ते ठरवा. पैसा (Money) मिळवणे हे केवळ महत्त्वाचे नाही, तर तो पैसा कुठे वापरला जात आहे हेही महत्त्वाचे आहे. तरच तुम्हाला आनंद आणि यश (Success) मिळेल. पैसे आल्यावर दान करा हेही लक्षात ठेवा.

3. काम करा

काम म्हणजे तुमच्या आयुष्यात ध्येय ठेवा, तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे ते ठरवा. नोकरी तुमच्यासाठी योग्य असेल का? तसेच, तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या वेळेत घेतल्यास चांगले होईल. चाणक्‍याने म्हटले आहे की, काम करणार्‍याला देव स्वतः आधार देतो. म्हणूनच आपल्या कामातून कधीही मागे हटू नका.

Chanakya Niti On Life
Stress And Teenagers : धक्कादायक वास्तव समोर, १० पैकी ७ तरुण तणावग्रस्त; का उचलताहेत टोकाचं पाऊल? कारणं समोर

4. मोक्ष प्राप्ती

आचार्य चाणक्य म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीला मोक्षाची इच्छा असते. माणसाचे अंतिम गंतव्य मोक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे मोक्ष मिळतो. जो सत्कर्म करतो, त्यालाच मोक्ष मिळतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com