Chanakya Niti Father Son Relation: मुलांच्या आणि वडिलांच्या नात्यात दूरावा येतोय? या गोष्टींची काळजी घ्या

Relationship Tips : बरेचदा एकमत न झाल्यामुळे वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यात अंतर वाढू लागते.
Chanakya Niti Father Son Relation
Chanakya Niti Father Son RelationSaam Tv
Published On

Relationship With Father Son : सगळ्यात सुंदर पण तितकीच कठीण नातं ते मुलांच वडिलांसोबत. वडिल हे मुलांशी कडक शिस्तीने वागतात. बरेचदा त्यांच्या मध्ये काही कारणांस्तव मतभेदही निर्माण होतात. अशावेळी नात्यात दूरावा येतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, मुलं ही आपल्या आई-वडिलांना आदर्श मानतात. ते ज्याप्रमाणे सांगतील तसे वागतात. पण बरेचदा एकमत न झाल्यामुळे वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यात अंतर वाढू लागते. अनेकवेळा परिस्थिती अशी बनते की, वडील आणि मुलाच्या इच्छेविरुद्धही अंतर येऊ लागते आणि वैचारिक मतभेद होतात. वडील आणि मुलामधील वाढते अंतर आणि त्यातून निर्माण होणारी दुरावा याची अनेक कारणे असू शकतात. जाणून घेऊया असे का होते.

Chanakya Niti Father Son Relation
Why Lift Has Mirror : लिफ्ट काचेची का असते? त्यात आरसा का असतो?

1. कुटुंबात (Family) वेगवेगळी नाती असतात, अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीचे विचार एकमेकांशी जुळले पाहिजेत असे नाही. त्याचप्रमाणे वडील (Father) आणि मुलामध्ये मतभेद होण्याची अनेक कारणे असू शकतात. याचे पहिले कारण म्हणजे जनरेशन गॅप. वडील आणि मुलाच्या वयातील फरक त्यांच्यात अंतर निर्माण करतो.

2. अनेकदा असे दिसून आले आहे की आईचे मन खूप मवाळ असते, तर वडील थोडे कठोर असतात. म्हणूनच तो आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी कठोरपणे वागतो. त्यामुळे मुलगा आणि वडील यांच्यात दुरावा निर्माण होतो.

Chanakya Niti Father Son Relation
Most Dangerous Fort In Maharashtra: डोळ्यांना स्वर्ग सुख देणारा महाराष्ट्रातील खतरनाक किल्ला, संध्याकाळ होण्यापूर्वीच परतावे लागते

3. कधीकधी वडील आणि मुलगा एकमेकांशी सहमत नसतात. वैचारिक मतभेदही एक कारण असू शकतात. कोणत्याही नात्यात (Relationship) वैचारिक मतभेद असले तरी वडील आणि मुलगा दोघेही पुरुष आहेत. अशा परिस्थितीत पुरुषी अहंकार त्यांचे नाते बिघडवतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com