Chanakya Niti On Anger Management : राग हा माणसाचा शत्रूच! रागात या गोष्टी बोलूच नका, चाणक्यांनी दिला सल्ला

Chanakya Niti : आचार्य चाणक्य म्हणतात की, आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की, माणूस आपला संयम सोडतो.
Chanakya Niti On Anger Management
Chanakya Niti On Anger Management Saam tv
Published On: 

How To Control Anger :

माणसाने नेहमी विचार करुन बोलावे. एखाद्यावेळी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी न घडल्यास आपल्याला राग येऊ लागतो. त्यामुळे आपण तो सहज दुसऱ्यावर काढतो. बरेचदा बोलताना काय बोलावे, कधी बोलावे हे देखील समजून घ्यायला हवे.

आचार्य चाणक्य म्हणतात की, आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की, माणूस आपला संयम सोडतो. त्यामुळे बोलताना किंवा राग अनावर झाल्यास त्याचे शब्द विषासारखे बाहेर पडू लागतात. रागात बोले जाणारे शब्द राग शांत झाल्यानंतर आठवू लागतात तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नसतो. अशावेळी तुम्हालाही राग आल्यावर काय करायला हवे हे पाहूया

1. विचारपूर्वक बोला

रागात आपण बोलताना संयम ठेवायला हवा. अशावेळी जीभ (tongue) ही धारदार शस्त्रासारखी असते. ज्याचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर होतो. ज्याने ती दुखावली जाते.

2. बोलण्यावर नियंत्रण ठेवा

बरेचदा रागात (Anger) आपण समोरच्या अपशब्द बोलतो, त्याचा अपमान करतो. ज्यामुळे तो दुखावला जातो. म्हणून बोलताना नियंत्रण ठेवा.

Chanakya Niti On Anger Management
Konkan Famous Fort In Sea face: कोकणातला 'अंजिक्य किल्ला' आहे समुद्रात, येथील विलोभनीय दृश्य तरुणाईला घालते भुरळ

3. लगेच प्रतिसाद नको

कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिसाद देऊ नका. कुणीही काही बोललं तर आधी त्याचा विचार करा. समोरचा व्यक्ती शांत झाला की, त्यावर प्रतिक्रिया द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.