Cerebral Palsy: सेरेब्रल पाल्सीवर आता केवळ फिजिओथेरपी नाही; रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि न्यूरो रिहॅबिलिटेशनमुळे उपचारांना नवी दिशा

Cerebral Palsy in Children: सेरेब्रल पाल्सीमध्ये मुलांच्या हालचाली, बोलणे आणि दैनंदिन कौशल्यांवर परिणाम होऊ शकतो. फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन महत्त्वाचे ठरतात. रिजनरेटिव्ह मेडिसिनसारख्या नव्या पद्धतींचा सध्या संशोधनातून अभ्यास सुरू आहे.
Cerebral Palsy
Cerebral Palsysaam tv
Published On: 

सेरेब्रल पाल्सीमुळे मुलांच्या हालचाली, शरीराचा तोल, बोलणं किंवा दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक मुलामध्ये या समस्येची तीव्रता आणि गरजा वेगवेगळ्या असल्याने केवळ एका उपचारावर अवलंबून न राहता फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि इतर रिहॅब पद्धतींच्या मदतीने दीर्घकाळ उपचार करावे लागतात. आता रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि इलेक्ट्रो न्यूरो रिहॅबिलिटेशनसारख्या नव्या पद्धतींचाही याबाबत अभ्यास सुरू असून, भविष्यात सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांना अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांनी सांगितलं की, न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे केवळ फिजिओथेरपी नाही. सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलाला शारीरीक हालचाली, बोलणं, दैनंदिन कामं आणि इतर कौशल्ये सुधारण्यास मदत करणारी ही दीर्घकालीन उपचारपद्धती आहे. मेंदूची आकलन क्षमता तसेच बदल स्वीकारण्याची क्षमता लक्षात घेऊन मुलाला वारंवार योग्य सराव दिला जातो. त्यामुळे उपलब्ध क्षमतांचा अधिक चांगला वापर करण्यास मदत होऊ शकते.

Cerebral Palsy
H1N1 eye symptoms: तुम्हालाही फ्लूनंतर डोळ्यांत जळजळ होतेय? 'या' एका चुकीमुळे वाढू शकतो मोठा धोका

मुलाच्या गरजेनुसार फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, विकासात्मक उपचार तसंच आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणांचा वापर केला जाऊ शकतो. पालकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरी नियमितपणे करून घेतलेले व्यायामही यावेळी उपचाराचा महत्त्वाचा भाग ठरतात.

रिजनरेटिव्ह मेडिसिन हे सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमधील संशोधनाचं एक नवं क्षेत्र आहे. पेशींवर आधारित उपचारपद्धतींचा मेंदूतील सूज, पेशींची दुरुस्ती आणि न्यूरोप्लास्टिसिटीवर काही परिणाम होतो का, याचाही अभ्यास सुरू आहे.

भविष्यात रिजनरेटिव्ह मेडिसिन क्षेत्रातील नव्या उपचारपद्धती आणि वैयक्तिक गरजांनुसार केले जाणारे न्यूरो रिहॅबिलिटेशन यांचा एकत्रित वापर होण्याची शक्यता आहे. मात्र, यामध्ये वैज्ञानिक पुरावे, उपचारांची सुरक्षितता आणि वास्तववादी अपेक्षा यांना सर्वाधिक महत्त्व देणं आवश्यक आहे.

स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्स आणि महाजन हॉस्पिटलमध्ये रिजनरेटिव्ह मेडिसिन आणि इलेक्ट्रो न्यूरो रिहॅबिलिटेशन यांचा एकत्रित दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. यामध्ये मेंदू आणि मज्जासंस्थेतील जैविक प्रक्रिया तसेच हालचाली आणि कार्यक्षमता या दोन्ही बाबींवर लक्ष केंद्रित केलं जातं. पेशींवर आधारित उपचार आणि एक्सोसोमवर आधारित उपचारपद्धतींनी सूज कमी करणं, पेशींची दुरुस्ती, सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे कार्य, पेशींमधील ऊर्जा निर्मिती आणि न्यूरोप्लास्टिसिटीवर होणारा संभाव्य परिणाम यासाठी अभ्यास केला जात आहे. मात्र, या उपचारांची प्रत्यक्ष वैद्यकीय परिणामकारकता अद्याप संशोधनाच्या टप्प्यात आहे.

सेरेब्रल पाल्सीमध्ये वेळीच उपचार सुरू करणं महत्त्वाचं आहे. बालपणात मेंदूची जुळवून घेण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मुलाचे योग्य मूल्यमापन करून त्याच्या गरजा ओळखणे गरजेचे आहे.

Cerebral Palsy
Liver disease symptoms: लघवीचा रंग सांगतो तुमचं लिव्हर खराब झालंय; शरीर पोखरण्याआधी ‘ही’ 5 लक्षणं वेळीच ओळखा

सेरेब्रल पाल्सीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारे होत असल्याने उपचारही प्रत्येकासाठी वेगळे असणे आवश्यक आहे. उपचारांचा परिणाम वस्तुनिष्ठ पद्धतीने मोजण्यासाठी GMFM आणि MAS यांसारख्या पद्धतींसोबत आवश्यक न्यूरोलॉजिकल तपासण्यांचाही वापर केला जाऊ शकतो.

उपचारपद्धतीमध्ये मुलाच्या शरीराला आवश्यक मदत देणं, मेंदूची कार्यक्षमता वाढवणं आणि हालचालींचा नियमित सराव करून घेणं यावर भर दिला जातो. यामुळे मुलाला दैनंदिन कामं अधिक चांगल्या प्रकारे करता यावीत, शक्य तितकं स्वावलंबी होता यावं आणि त्याचे जीवनमान सुधारावं, हा यामागचा उद्देश आहे.

Cerebral Palsy
Brain attack symptoms: चक्कर आणि डोकेदुखीला हलक्यात घेऊ नका; ब्रेन अटॅकची 3 लक्षणं वेळीच ओळखा

सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांकडे आता केवळ एका उपचाराच्या दृष्टीने न पाहता, मुलाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या उपचारांचा एकत्रित विचार केला जातोय. यामध्ये न्यूरो रिहॅबिलिटेशनला महत्त्वाचं स्थान आहे. नियमित आणि सातत्यपूर्ण सरावामुळे मुलाच्या मेंदूला आणि शरीराला हालचाली तसंच इतर दैनंदिन कामं शिकण्यास आणि उपलब्ध क्षमतांचा अधिक चांगला वापर करण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com