Brain attack symptoms: चक्कर आणि डोकेदुखीला हलक्यात घेऊ नका; ब्रेन अटॅकची 3 लक्षणं वेळीच ओळखा

Surabhi Jayashree Jagdish

ब्रेन अटॅक नेमका कसा होतो?

स्ट्रोकमध्ये मेंदूच्या एखाद्या भागाला जाणारा रक्तपुरवठा बंद होतो किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते. त्यामुळे मेंदूच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे या पेशी खराब होऊ लागतात.

brain stroke | saam tv

चेहरा वाकडा होणं

स्ट्रोकमध्ये शरीराच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा सुन्नपणा जाणवू शकतो. हात किंवा पाय अचानक नीट हलत नसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणं किंवा हसताना चेहऱ्याची एक बाजू नीट न हलणं हेही महत्त्वाचे संकेत आहेत.

stroke warning signs | saam tv

अचानक बोलताना अडचण

अचानक बोलताना शब्द अस्पष्ट होणं, जीभ अडखळणं किंवा योग्य शब्द न सुचणं हे स्ट्रोकचं लक्षण असू शकते. समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे समजण्यास अचानक त्रास होऊ शकतो.

face drooping stroke | saam tv

अचानक खूप तीव्र डोकेदुखी

काही प्रकारच्या स्ट्रोकमध्ये कोणतंही स्पष्ट कारण नसताना अचानक खूप तीव्र डोकेदुखी होऊ शकते. यासोबत उलटी, बेशुद्ध पडणं किंवा शरीराच्या एखाद्या भागात सुन्नपणा जाणवू शकतो. अशी लक्षणं अचानक सुरू झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे.

slurred speech stroke | saam tv

दुर्लक्ष करू नका

स्ट्रोकसारखी काही लक्षणं काही मिनिटांत किंवा काही तासांत कमी होऊ शकतात. पण लक्षणं आपोआप बरी झाली म्हणजे धोका टळला, असं समजू नये. हा ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA), म्हणजेच ‘मिनी स्ट्रोक’ असू शकतो.

severe headache stroke | saam tv

स्ट्रोकचा धोका वाढवणाऱ्या सवयी

अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, तंबाखूचं सेवन, अतिप्रमाणात मद्यपान आणि लठ्ठपणा यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल यांसारख्या स्थितींचाही रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊ शकतो.

mini stroke | saam tv

नियमित काळजी घ्या

नियमित आरोग्य तपासणी केल्याने रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या गोष्टींवर लक्ष ठेवता येतं. संतुलित आहार घेणं आणि नियमित शारीरिक हालचाल करणं महत्त्वाचं आहे. स्ट्रोकची अचानक लक्षणं दिसल्यास घरच्या घरी थांबण्याऐवजी शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्यावी.

stroke prevention | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

cholesterol and stroke | saam tv

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG fuel economy | saam tv
येथे क्लिक करा