Sleeping Problems : सगळेच उपाय करुन थकलात, तरीही रात्रीची शांत झोप लागत नाही ? या चुकांमुळे बिघडतेय झोपेचं गणित

Insomnia : व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व झोपचे बिघडलेले गणित यामुळे आपल्या झोप येत नाही.
Sleeping Problems
Sleeping ProblemsSaam Tv
Published On

Ratri Zop Ka Lagat Nahi : शरीराच्या आरोग्यासाठी झोप ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

व्यस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व झोपचे बिघडलेले गणित यामुळे आपल्या झोप येत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्रीची किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे अंत्यत गरजेचे आहे. परंतु, १०० पैकी १० टक्के तरी लोक असे आहेत ज्यांना रात्रीची शांत झोप लागत नाही. काहीजण तर डोळे बंद करुन असेच सकाळ होण्याची वाट पाहात असतात. परंतु, दिवसभरात केलेल्या चुकामुळे त्यांना रात्रीची शांत झोप लागत नाही. ज्यामुळे झोपेचा त्रास व निद्रानाशाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

Sleeping Problems
How To Grow Kids Height After 16 Years : फक्त हे 5 उपाय करुन पाहा; वयाच्या 16 व्या वर्षीही वाढले मुलांची उंची...

1. रात्रीचे जेवण

असे म्हटले जाते की, रात्रीचे जेवण (Food) हे लवकर करावे. जेव्हा तुम्ही उशीरा जेवता तेव्हा तुमच्या छातीत जळजळ होते ज्यामुळे झोपायला खूप त्रास होतो. रात्रीच्या वेळी आपली चयापचय क्रिया थांबते. यामुळे आपण रात्रीचे जेवण हे झोपण्यापूर्वी किमान २ तासाआधी करायला हवे.

Sleeping Problems
Brain Foods For Children : मुलांची बुद्धी तल्लख व्हावी, अभ्यासात हुशार व्हावी असं वाटतं? ही ५ पदार्थ खाऊ घाला

2. पोषक तत्वांचा वापर कमी

रात्री हलके जेवण करावे पण याचा अर्थ असा नाही की, पोषक घटकांचा समावेश करु नये. आहारात फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) व खनिजे यांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला मध्यरात्री भूक लागणार नाही व तुम्ही आरामात झोपू शकतात.

3. अल्कोहोलचे सेवन

अनेक जणांना असे वाटते की, दारु प्यायल्याने स्ट्रेस कमी होतो. परंतु, यामुळे झोपेचे गणित बिघडते. बरेचदा रात्री झोप अनेकवेळा मोडते. त्यामुळे झोप देखील पूर्ण होत नाही.

Sleeping Problems
Sweet Potato Benefits : केसांची वाढ खुंटलीये ? त्वचा निस्तेज झालीये ? मग रताळ्याचा आहारात आजपासूनच समावेश करा

4. चहा -कॉफी

अनेकांना रात्री झोपताना चहा किंवा कॉफी (Coffee) पिण्याची सवय असते. यामध्ये कॅफिनयुक्त पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते. त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. शक्यतो. रात्रीच्या वेळी चहा-कॉफी पिणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com