Sweet Potato Benefits : केसांची वाढ खुंटलीये ? त्वचा निस्तेज झालीये ? मग रताळ्याचा आहारात आजपासूनच समावेश करा

Sweet Potato Benefits For Skin : रताळ्याचे सेवन नियमितपणे केल्यास केसांची वाढ होते, त्वचा उजळते व आजाराच्या इतर अनेक समस्यांवर मात करता येते.
Sweet Potato Benefits
Sweet Potato BenefitsSaam Tv
Published On

Sweet Potato Benefits For Hair Growth : अगदी लहानपणापासून आपल्या अनेक भाज्या व फळे खाण्याचा सल्ला डॉक्टरांपासून ते घरच्यांपर्यंत दिला जातो. ज्यामुळे आपले आरोग्य अधिक सुदृढ होते. तसेच याचे सेवन नियमितपणे केल्यास केसांची वाढ होते, त्वचा उजळते व आजाराच्या इतर अनेक समस्यांवर मात करता येते.

भाज्या व फळांमध्ये असे अनेक न्यूट्रिएंट्स व मिनरल्स असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. ज्यामध्ये लोहाचे प्रमाणही भरपूर असते. परंतु तुम्हाला माहीत आहे का ? फक्त भाज्या व फळांमध्येच आवश्यक पोषक घटक नसतात तर काही असेही कंदमूळे आहेत जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

Sweet Potato Benefits
Home Remedies For White Hair: पांढऱ्या केसांना डायची गरज नकोच! हा आयुर्वेदिक उपाय करुन पाहा, केस होतील काळेभोर व दाट

बदलेल्या जीवनशैलीनुसार केसांची (Hair) वाढ खुंटते, त्वचा निस्तेज होते अशावेळी रताळ्याचा आहारात समावेश केल्यास आपल्याला केसगळतीच्या समस्येपासून फायदा (Benefits) होऊ शकतो. जाणून घेऊया कसे ते.

रताळे खाण्याचे फायदे

1. सूर्यापासून त्वचेचे रक्षण

रताळे हे बीटा -कॅरेटीनचे सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. यामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) ए अधिक प्रमाणात असते. ज्यामध्ये अँटिऑक्सिडेंट अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे उन्हापासून त्वचेचे संरक्षण होऊ शकते.

Sweet Potato Benefits
How To Grow Kids Height After 16 Years : फक्त हे 5 उपाय करुन पाहा; वयाच्या 16 व्या वर्षीही वाढले मुलांची उंची...

2. त्वचेची चमक

बीटा -कॅरेटीन असलेल्या पदार्थाचे नियमित आहारात सेवन केल्यास त्वचा चमकण्यास मदत होते. तसेच रताळ्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट फ्री रॅडिकल्सचे नुकसान कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा ग्लो होतो.

3. अकाली वृद्धत्वासाठी फायदेशीर

रताळ्यामध्ये जीवनसत्त्व क चे प्रमाण ही असते. हे जीवनसत्त्व कोलेजनच्या संश्लेषणात महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यामुळे त्वचेची लवचिकता प्रभावित होण्यास मदत होते. सुरकुत्या आणि कोरडेपणा टाळण्यासाठी व्हिटॅमिन ए देखील फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्हाला मुलायम आणि तरुण त्वचा हवी असेल तर रोजच्या आहारात रताळ्याचा वापर करा

Sweet Potato Benefits
Oily Skin Need Moisturizer : तेलकट त्वचेला मॉश्चरायझरची गरज असते का? कोणते मॉश्चरायझर आहे बेस्ट ? जाणून घ्या

4. चट्टे कमी करते

रताळ्यामध्ये अँथोसायनिन्स असतात, ज्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे डाग टाळण्यास मदत करू शकतात.

5. केसांसाठी फायदेशीर

रताळ्यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन घटक केस गळणे आणि पातळ होण्यास देखील मदत करू शकतात. जीवनसत्त्वे ए आणि क व्यतिरिक्त, यामध्ये जीवनसत्त्वे बी आणि ई तसेच पोटॅशियम, मॅंगनीज इत्यादी खनिजे देखील भरपूर आहेत. हे सर्व पोषक आरोग्यासाठी तसेच केसांसाठी फायदेशीर आहेत आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com