4 दिवसांत डायबेटीज गायब होणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

can diabetes be cured in 4 days truth : डायबेटीज 4 दिवसांत बरा होतो असा व्हायरल दावा खरा की खोटा? डॉक्टरांच्या नावाने पसरवलेल्या व्हिडिओमागचं सत्य जाणून घ्या आणि योग्य उपचारांची माहिती मिळवा.
Diabetes
Diabetes Saam TV
Published On

Fact Check Health Claims : आता डायबिटीज 4 दिवसांत बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय...खरंच 4 दिवसांत डायबिटीज बरा होणं शक्य आहे का...? देशभरात कोट्यवधी डायबिटीजग्रस्त आहेत...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात

व्हायरल व्हिडिओत काय?

या व्हिडिओत डायबेटीज आता 4 दिवसांत बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच 4 दिवसात डायबेटीज बरा होऊ शकतो का...? असं कोणतं औषध आहे यामुळे डायबेटीज बरा करणं शक्य आहे...देशभरात कोट्यवधी डायबेटीसचे रुग्ण आहेत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेऊन सत्य समोर आणणं गरजेचं आहे...

डॉक्टर देवी शेट्टींच्या नावाने हा व्हिडिओ व्हायरल होतोय...3 मिनिटे आणि 10 सेकंदांचा व्हिडिओत डायबिटीज बद्दल बोलताना ऐकायला येतंय...साखरेचं प्रमाण नियंत्रणात कसं आणायचं, आनंदी जीवन जगा, जेवणाचा आनंद घ्या, असं या व्हिडिओतून सांगण्यात आलंय...या दाव्यामुळे आम्ही पडताळणी सुरू केली...आधी देशात किती डायबेटीजग्रस्त आहेत त्याची माहिती मिळवली...ICMR-INDIAB-17 च्या ताज्या आकडेवारीनुसार...

देशात 10 कोटी डायबेटीजग्रस्त?

देशात अंदाजे 10 कोटी 10 लाख डायबेटीजग्रस्त

13 कोटी 60 लाख लोकांना प्रीडायबिटीज

2019 साली 7 कोटी 70 लाख डायबेटीजग्रस्त होते

2045 पर्यंत 13 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त होण्याची शक्यता

Diabetes
Kharat Case: अशोक खरातनं ५ जणांचा नरबळी दिला? धक्कादायक दावा, वाचा कोर्टात नेमकं काय काय झालं

चिंताजनक बाब म्हणजे, यापैकी अंदाजे 57% लोकांना त्यांच्या आजाराबद्दल माहिती नाही...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...खरंच असं कोणतं औषध आलंय का...? याबद्दल अधिक माहिती आम्ही डायबिटीजवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून मिळवली. व्हायरल व्हिडिओतील डॉक्टरांचा व्हिडिओ जागतिक हृदय दिनानिमित्त केलेला आहे...2022 चा हा व्हिडिओ आहे...व्हायरल व्हिडिओतील आवाज डबिंग करण्यात आलाय...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य, साम इन्व्हिस्टिगेशन

4 दिवसांत डायबिटीज बरा करणं अशक्य

डायबिटीज 4 दिवसात बरा होणारा आजार नाही

पातळी अधिक असलेल्यांना रोज गोळ्या घ्याव्या लागतात

कमी आहे त्यांना उपचाराने डायबेटीज कमी करता येतो

Diabetes
₹५०० चा गॅस फुकटात मिळणार, १ लाखाचं बक्षीसही मिळणार, पण कुणाला? वाचा काय आहे बंपर योजना

डायबेटीजच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि अचूक माहितीच्या अभावामुळे, लोक खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर सहज विश्वास ठेवतात. त्यामुळे विश्वसनीय स्रोतांकडून अचूक माहिती मिळवणे आणि जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या पडताळणीत 4 दिवसांत डायबेटीज बरा होऊ शकतो हा दावा असत्य ठरलाय.

Diabetes
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण! तब्बल ३३ हजारांनी झालं स्वस्त; वाचा खरेदीची हीच योग्य वेळ आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com