Heart attack: सततच्या बद्धकोष्ठतेच्या त्रासाने येऊ शकतो हार्ट अटॅक? 3 दिवसांपूर्वी दिसून येतात ही १० लक्षणं

Can constipation cause heart attack: दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास केवळ पचनसंस्थेपुरता मर्यादित नसून हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतो. संशोधनानुसार सतत होणारी बद्धकोष्ठता भविष्यात हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकते.
Heart attack
Heart attacksaam tv
Published On

हृदयाला योग्य पद्धतीने काम करण्यासाठी सतत ऑक्सिजनयुक्त रक्ताची गरज असते. हा रक्तपुरवठा हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम कोरोनरी आर्टरीज म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्या करतात. परंतु काही कारणांमुळे या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण झाला तर हृदयाच्या स्नायूंना आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. अशा परिस्थितीत हार्ट अटॅक येऊ शकतो.

वैद्यकीय भाषेत हार्ट अटॅकला 'मायोकार्डियल इन्फार्क्शन' असं म्हणतात. हा अत्यंत गंभीर आणि अनेकदा जीवघेणा आजार मानला जातो. एका अहवालानुसार, ऑस्ट्रेलियामध्ये दररोज सुमारे 18 ते 20 जणांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होतो. त्यामुळे या आजाराची लक्षणं आणि त्यामागील कारणं वेळेत ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.

Heart attack
Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, पाण्याचं अपुरं सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताण यामुळे ही समस्या खूपच सामान्य झाली आहे. विविध अहवालांनुसार भारतातील मोठ्या प्रमाणावर लोक बद्धकोष्ठतेने त्रस्त आहेत.

बद्धकोष्ठता ही साधी समस्या वाटत असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कारण दीर्घकाळ बद्धकोष्ठता राहिल्यास मूळव्याध, फिशर यांसारखे त्रास निर्माण होण्याची शक्यता वाढते. काही लोक दिवसातून तीन ते चार वेळा शौचास जातात, तर काहींना आठवड्यातून फक्त काही वेळाच शौचास होते. त्यामुळे प्रत्येकाची शारीरिक रचना वेगळी असली तरी दीर्घकाळ चालणारा त्रास दुर्लक्षित करू नये.

बद्धकोष्ठता आणि हार्ट अटॅक यांचा काय संबंध?

अलीकडेच मेलबर्नमधील मोनाश विद्यापीठाच्या संशोधनात एक महत्त्वाची बाब समोर आलीये. या संशोधनानुसार, वारंवार होणारी बद्धकोष्ठतेची समस्या केवळ पचनसंस्थेपुरती मर्यादित नसून ती हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते.

Heart attack
Menstrual Hygiene: सॅनिटरी पॅड्समधील केमिकल्स आरोग्यासाठी किती धोकादायक? डॉक्टरांनी सांगितला शरीरावर होणारा परिणाम

या संशोधनाशी संबंधित प्राध्यापक फ्रान्सिस मार्क्स यांनी सांगितलं की, बद्धकोष्ठता ही खूप सामान्य समस्या असली तरी ती सतत होत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण काही वेळा ती हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्येचा इशारा असू शकते. जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि भविष्यात हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

Heart attack
Kidney Cancer: या 6 व्यक्तींना असतो किडनीच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

3 दिवसांपूर्वी कोणती लक्षणं दिसून येतात?

  • छातीत वेदना किंवा दाब जाणवणं

  • डाव्या हातामध्ये वेदना

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • पाठदुखी

  • मळमळ

  • उलटी होणं

  • चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं

  • हृदयाचे ठोके अनियमित होणं

  • थंड घाम येणं

  • छातीत जडपणा जाणवणं

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com