Menstrual Hygiene: सॅनिटरी पॅड्समधील केमिकल्स आरोग्यासाठी किती धोकादायक? डॉक्टरांनी सांगितला शरीरावर होणारा परिणाम

Sanitary Pad Chemicals: सॅनिटरी पॅड्समध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सबद्दल महिलांमध्ये वाढत्या शंका आहेत. तज्ज्ञांच्या मते बहुतेक पॅड्स सुरक्षित असतात, पण संवेदनशील त्वचेवर काही घटकांमुळे त्रास होऊ शकतो. योग्य स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.
Menstrual Hygiene Day 2023
Menstrual Hygiene Day 2023Saam Tv
Published On

सध्या महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅड्समधील केमिकल्सबद्दल अनेक शंका आणि चर्चा सुरू आहेत. स्वच्छता आणि सोयीसाठी पॅड्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो पण त्यात वापरल्या जाणाऱ्या काही घटकांमुळे शरीरावर काही परिणाम होऊ शकतो का, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झाला आहे. याबाबत ओनली माय हेल्थ वेबसाईटला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री कार्तिक नागेश यांनी महत्त्वाची माहिती दिलीये.

डॉक्टरांच्या मते, बाजारात मिळणारे सॅनिटरी पॅड्स सामान्यतः सुरक्षित मानले जातात. हे पॅड्स विक्रीपूर्वी त्यांची योग्य ती चाचणी केली जाते. त्यामुळे बहुतेक महिलांसाठी त्यांचा वापर धोकादायक नसतो. मात्र काही पॅड्समध्ये सुगंध, रंग, adhesive, ब्लीचिंग एजंट्स आणि जास्त शोषण क्षमता देणारे घटक वापरले जातात. हे घटक प्रमाणात कमी असले तरी काही संवेदनशील त्वचेच्या महिलांमध्ये त्रास निर्माण करू शकतात.

Menstrual Hygiene Day 2023
Toxic relationship: प्रेमाच्या नावाखाली तुम्हीही टॉक्सिसिटीचा सामना करत नाहीये ना? जाणून घ्या संकेत

काही महिलांना सुगंधित पॅड्स वापरल्यानंतर खाज, जळजळ, त्वचेचा लालसरपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः उष्ण हवामानात किंवा एकच पॅड दीर्घकाळ वापरल्यास ही समस्या अधिक वाढू शकते. प्रायव्हेट भागातील त्वचा अतिशय नाजूक असल्यामुळे फ्रिग्रन्स आणि केमिकलमुळे तिथे इरिटेशन होण्याची शक्यता असते. काही वेळा स्वच्छतेकडे दुर्लक्ष, खूप घट्ट कपडे घालणं किंवा वेळेवर पॅड न बदलणं यामुळे बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका देखील वाढू शकतो.

Menstrual Hygiene Day 2023
Relationship advice: घरच्यांना गर्लफ्रेंडबद्दल सांगण्याची योग्य वेळ ओळखायची कशी? या गोष्टी नक्की जाणून घ्या

महिलांनी कोणते सॅनिटरी नॅपकिन्स वापरावेत?

संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, असं डॉक्टरांचं मत आहे. शक्य असल्यास सुगंधी नसलेले, कॉटन किंवा ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स वापरणं अधिक सुरक्षित ठरते.

Menstrual Hygiene Day 2023
Mosquito bites: काही लोकांना डास अधिक का चावतात?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीच्या काळात योग्य स्वच्छता राखणं आवश्यक आहे. पॅड दर 4 ते 6 तासांनी बदलणं, हात स्वच्छ धुणं आणि प्रायव्हेट भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणं हे इन्फेक्शन टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com