Kidney Cancer: या 6 व्यक्तींना असतो किडनीच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Kidney Cancer Risk: किडनीचा कॅन्सर सुरुवातीला लक्षणांशिवाय वाढू शकतो. वाढते वय, धूम्रपान, लठ्ठपणा, कुटुंबातील कॅन्सरचा इतिहास आणि डायलिसिसवरील रुग्णांना या आजाराचा धोका अधिक असू शकतो. तज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Kidney Cancer
Kidney Cancersaam tv
Published On

किडनीचा कॅन्सर हा एक जीवघेणा आजार असून या समस्येमध्ये किडनीच्या पेशी असामान्यपणे वाढतात. कालांतराने त्यांच्या गाठी तयार होतात. सुरुवातीला यात अनेकदा कोणतीही मोठी लक्षणं दिसत नाहीत, म्हणूनच बहुतेक प्रकरणांमध्ये याचे निदान उशिरा होते. किडनीच्या कॅन्सरसाठी अनेक धोक्याचे घटक आहेत, जे ओळखल्याने तुम्हाला या कॅन्सरचा किती धोका आहे याचा अंदाज लावता येतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींना लोकांना किडनीच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्समधील वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट, क्लिनिकल डायरेक्टर आणि नेफ्रोलॉजी व ट्रान्सप्लांट सर्व्हिसेसचे विभागप्रमुख डॉ. राजशेखर चक्रवर्ती मदारासू यांनी ओनली माय हेल्थ वेबसाईटला अधिक माहिती दिलीये. यामध्ये त्यांनी कोणत्या लोकांना किडनीच्या कॅन्सरचा अधिक धोका असतोहे सांगितलंय.

Kidney Cancer
UTI In Women: महिलांना वारंवार का होतं यूरिन इंफेक्शन? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची ४ कारणं

वाढते वय

वाढतं वय हे देखील किडनीच्या कॅन्सरचं एक कारण असू शकतं. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना किडनीच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, पुरुषांना महिलांपेक्षा किडनीचा कॅन्सरचा होण्याचा धोका दुप्पट असतो.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती

ज्या व्यक्ती धूम्रपान करतात किंवा ज्यांनी पूर्वी धूम्रपान केलंय त्यांना किडनीच्या समस्या निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. ज्यामुळे किडनीच्या कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

चयापचयाच्या समस्या असलेले रुग्ण

चयापचयाच्या समस्यांमुळे देखील किडनीचा कॅन्सर होण्याचा धोका असू शकतो. अशा व्यक्तींनी तपासणीला प्राधान्य दिलं पाहिजे. जर तुम्ही या गटात मोडत असाल तर तपासणी आणि उपचारांसाठी उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

Kidney Cancer
Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

लठ्ठ व्यक्ती

जर तुम्ही लठ्ठ असाल आणि तुमचा रक्तदाब नियंत्रणात नसेल तर तुम्हाला किडनीच्या कॅन्सरचा धोका अधिक असू शकतो. लठ्ठपणामुळे टाईप २ मधुमेह आणि थायरॉईडसारखे इतर आजारही होऊ शकतात, ज्यामुळे अशा व्यक्तींना कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका अधिक असतो.

कुटुंबात कॅन्सरचा इतिहास

ज्या लोकांना अनुवांशिक संभ्रम आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात किडनीच्या कॅन्सरचा इतिहास आहे, त्यांनाही याचा धोका असू शकतो. अशा व्यक्तींनी नियमित तपासणी करून घेतली पाहिजे.

Kidney Cancer
Menstrual Hygiene: सॅनिटरी पॅड्समधील केमिकल्स आरोग्यासाठी किती धोकादायक? डॉक्टरांनी सांगितला शरीरावर होणारा परिणाम

डायलिसिसवर असलेले रुग्ण

डायलिसिसवर असलेल्या किंवा दीर्घकालीन किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना सर्वसामान्य लोकांपेक्षा किडनीच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com