
महिलांमध्ये कॅल्शियम कमतरतेची समस्या वाढत आहे.
हाडे, स्नायू, आणि दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम अत्यावश्यक आहे.
संतुलित आहार आणि सूर्यप्रकाशामुळे कॅल्शियम नैसर्गिकरित्या वाढते.
लवकर लक्षणे ओळखून उपाय केल्यास गंभीर आजार टाळता येतात.
महिला या दिवसभरात कामाच्या धावपळीत स्वत:च्या कितीतरी समस्या दूर करतात. घरातले जेवण, साफसफाई, मुलांच्या शाळा, स्वत:च काम, कामासाठी प्रवास अशा गोष्टींमध्ये महिलांची दमछाक होते. त्यामुळे महिलांना कमी वयातच स्नायुंच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम हे फक्त हाडांसाठी आवश्यक नाही, तर ते आपल्या शरीराच्या अनेक क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. हृदयाची धडधड, स्नायूं दुखणे, नर्व्ह सिग्नल्स आणि रक्तात गाठी तयार होणे या सगळ्या गोष्टींसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. विशेषतः महिलांसाठी मासिक पाळी, प्रेग्नंसीच्या वेळेस आणि रजोनिवृत्तीच्या काळात कॅल्शियमचे प्रमाण योग्य ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
कॅल्शियमची कमतरता झाल्यास खालील ६ लक्षणे दिसू शकतात
सांधे दुखी ही समस्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कॅल्शियम कमतरता असल्याने स्नायूंना योग्य प्रकारे त्यांचे कार्य करता येत नाही. त्यामुळे पाय, हात, किंवा चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानक आकडी येऊ शकते.
हात, पाय तोंडाभोवती मुंग्या येणे ही समस्या तुम्हाला यामध्ये निर्माण होऊ शकते. कॅल्शियम नर्व्ह सिग्नलसाठी महत्त्वाचे असते. कमी झाल्यास हाता-पाया झिणझिण्या येतात, सुन्नपणा जाणवतो असे त्रास होतात.
सतत दमल्यासारखे वाटणे, ऊर्जेचा अभाव, किंवा अशक्तपणा हेही कॅल्शियमच्या कमतरतेचे चिन्हं असू शकतात.
त्वचा कोरडी होणे, केस गळणे आणि नखं तुटणे ही कॅल्शियम कमरतेची लक्षणे असू शकतात. कॅल्शियम कमी झाल्यास त्वचा निस्तेज होते, केस कोरडे होऊन तुटतात आणि नखं कमजोर होतात.
शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यास ते हाडांमधून घेतले जाते. त्यामुळे दातांच्या इनेमलचा थर कमजोर होतो, दात सैल होतात आणि कीड लागू शकते.
हाडांचा कॅल्शियम कमी झाल्यास हाडं पोकळ होतात. त्यामुळे हाडंदुखी, सांधेदुखी आणि वारंवार फ्रॅक्चर होणे शक्य आहे.
महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता का होते?
अनियमित आहार, दूध व दुग्धजन्य पदार्थांचा अभाव, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि हार्मोनल बदलांमुळे होते.
कॅल्शियम कमतरतेची लक्षणे कोणती आहेत?
स्नायूंमध्ये थकवा, हाड दुखी, नखे तुटणे, त्वचा कोरडी होणे, दात सैल होणे ही लक्षणे दिसतात.
महिलांनी कॅल्शियमची भरपाई कशी करावी?
दूध, दही, पनीर, बदाम, तिळ, पालक आणि सूर्यप्रकाश यांचा आहारात समावेश करून.
कॅल्शियमची कमतरता टाळण्यासाठी काय करावे?
संतुलित आहार घ्यावा, व्यायाम करावा, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लिमेंट घ्यावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.