Car Price Hike : सणासुदीच्या काळात कारच्या किंमती वाढणार, पाहा कंपन्यांची यादी

Festival Season : सणासुदीच्या काळात प्रत्येकजण मोठ्या वस्तू खरेदी करतात. तसेच प्रत्येकाच कार घेण्याचं स्वप्न असतं.
Car Cost In Festival Season
Car Cost In Festival SeasonSaam Tv
Published On: 

Cars Become Expensive :

सणासुदीच्या काळात सगळेजण मोठ्या वस्तू खरेदी करतात. तसेच सणासुदीला कार घेण्याच स्वप्न अनेकजण बघतात. या सणासुदीच्या काळात कार कंपन्यांकडून ग्राहकांना अनेक ऑफर्स दिल्या जातात. जर तुम्हीही सणासुदीच्या काळात कार खरेदी करणार असाल तर कोणत्या कंपनीच्या कारची किती किंमत किती आहे जाणून घ्या.

Car Cost In Festival Season
Upcoming Cars October 2023 : खुशखबर ! ऑक्टोबरमध्ये लाँच होणार या 3 शानदार कार, वाचा संपूर्ण यादी

जर तुम्ही सणासुदीच्या काळात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर यावेळी तुम्हाला जास्त किंमत मोजून कार खरेदी करावी लागेल. कोणत्या कंपनीने कोणत्या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत? 

KIA

कंपनी 1 ऑक्टोबरपासून Seltos आणि Carensच्या किमतीत सुमारे दोन टक्क्यांनी वाढ करणार आहे. किया इंडियाचे कंपनीचे विक्री आणि विपणन प्रमुख हरदीप एस ब्रार पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. Kia Seltos 10.90 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत विकते. ही कार 22 व्हेरियंटमध्ये खरेदी केली जाऊ शकते. Kia Carens ची स्थानिक बाजारात 10.45 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विकते.  आणि टॉप मॉडेलच्या एक्स-शोरूममध्ये 18.95 लाख रुपये आहे.

Car Cost In Festival Season
Best Petrol Mileage Cars : दिसायला मस्त, फिचर्स जबरदस्त, 2023 च्या भारतातील सर्वोत्कृष्ट मायलेज कारची यादी पाहा

Mahindra Scorpio N SUV

कंपनीने नुकतीच Mahindra Scorpio N ची किंमत वाढवण्याची घोषणा केली होती. आता कंपनीने Mahindra XUV300 ची किंमतही वाढवली आहे. या शानदार एसयूव्हीची किंमत 68,501 रुपयांनी वाढली आहे.  महिंद्राने 5 स्टार सुरक्षा रेटिंग असलेल्या SUV ची किंमत वाढवण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.