सध्या बाजारात जवळपास प्रत्येक प्रकारच्या कारला प्रचंड मागणी आहे. नवीन कार खरेदी करताना ग्राहक तिचा लूक, फीचर्स, जागा, किंमत इत्यादी लक्षात ठेवतात, पण कार खरेदी करताना आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली जाते आणि ती म्हणजे तिचे मायलेज. महागड्या इंधनामुळे लोक आता जास्त मायलेज देणाऱ्या गाड्यांना जास्त महत्त्व देऊ लागले आहेत.
तसेच चांगली आणि स्वस्त या दोन गोष्टी भारतात कार खरेदी करताना सर्वात जास्त पाहतात. मग ती बाइक असो की कार. सध्या पेट्रेल आणि डिजेलचे दर गगनाला भिडले आहेत, ज्यामुळे लोकांना वाहन वापरणं देखील कठीण होऊन बसलं आहे, कारण त्यामुळे लोकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहेत.
परंतु, भारतात टॉप 5 पेट्रोल (Petrol) कार आहेत. ज्याचे मायलेज आणि फ्यूल एफिशियन्सीमध्ये दमदार आहे.यापैकी मारुती ही भारतीय बाजारपेठेत वाहनांची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी आहे .
जर तुम्ही आजकाल तुमच्यासाठी चांगले मायलेज असलेल्या पेट्रोल कारच्या शोधात असाल, तर मारुती कंपनीच्या (Company) या मारुती ग्रँड विटारा, मारुती सेलेरियो, होंडा सिटी, मारुती वॅगनआर या शक्तिशाली इंजिनांनी सुसज्ज असलेल्या उत्कृष्ट मायलेज देतात. या वर्षातील याच काही सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कार आहेत. याबद्दलची संपूर्ण यादी पहा.
मारुती ग्रँड विटारा
मारुती ग्रँड विटाराच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे तर त्यात पेट्रोल इंजिन आहे जे इलेक्ट्रिक मोटरला जोडलेले आहे. हे इंजिन 79 एचपी पॉवर आणि 141 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे e-CVT गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. हे 27.84 किमी प्रति लीटर मायलेज देते.
मारुती सेलेरियो
या कारमध्ये (Car) 998 सीसी तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे CNG पर्यायासह येते. पेट्रोलवर ते 76 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी पर्याय देखील आहेत. हे 26.6 किमी प्रति लीटर मायलेज देते.
होंडा सिटी
या कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे 6600rpm वर 119bhp आणि 4,300rpm वर 145Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन मॅन्युअल आणि सीव्हीटी दोन्ही पर्यायांमध्ये येते. 1.5-लिटर डिझेल व्हेरियंटला EHEV व्हेरिएंट हायब्रिड इंजिन मिळते. हे 26.5 किमी प्रति लीटर मायलेज देते.
मारुती वॅगनआर
1 लिटर पेट्रोल (67 PS आणि 89 MM) आणि 1.2-लीटर पेट्रोल (90 PS आणि 113 MM) या दोन इंजिनचा पर्याय ऑफर करते. 1 लीटर पेट्रोल इंजिनमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. हे 25.19 किमी प्रति लीटर मायलेज देते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.