Car Maintenance Tips : कार सर्व्हिसिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या;अन्यथा पडू शकते महाग

Car Guide : कारची सर्व्हिसिंग ही नियमितपणे करावी.
Car Maintenance Tips
Car Maintenance TipsSaam Tv
Published On

Car Servicing Tips :

सध्या सर्वांकडेच कार असते. प्रत्येकजण कुठेही जायचे असेल तर स्वतः च्या खाजगी कारचा वापर करतात. कार म्हटल्यावर तिची काळजीही घ्यायला हवी. जर तुमच्याकडेही कार असेल तर तिची सर्व्हिसिंग ही नेहमी करावी लागते. जेणेकरुन कार नवीनच वाटावी आणि त्यात कोणता बिघाड होऊ नये. यासाठी कार सर्व्हिसिंग केली जाते.

कार सर्व्हिसिंग करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर लांबच्या प्रवासाला जात असाल तर तुमची कार व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे. कार सर्व्हिसिंग करण्यासाठी एक ठरावीक वेळ असते. परंतु बहुतेकदा बरेचजण टाळाटाळ करतात. त्यामुळे अनेक प्रॉब्लेमस होऊ शकतात. कार सर्व्हिसिंग करताना नेहमी अनेक गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Car Maintenance Tips
Sign Of Heart Blockage : हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यावर दिसतात ही ५ लक्षणे, चुकूनही दुर्लक्ष करु नका; अन्यथा...

प्रॉब्लेम समजून घ्या

जर तुम्ही कार सर्व्हिसिंगला देत असाल तर त्यातील प्रॉब्लेम समजून घ्या. सर्व्हिस सेंटरवर गेल्यावर लगेचच हा प्रॉब्लेम सांगा. या गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या कारची सर्व्हिसिंग केली जाईल. लवकर लवकर काम करण्याच्या नादात तुम्ही अनेक लहान गोष्टी विसरता. त्यात इंडिकेटरची वायर, लाइट, इंजिन यासंबंधी गोष्टी असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घ्या.

एकदा कारला व्यवस्थित चेक करा

तुम्ही कार सर्व्हिसिंग सेंटरला नेण्याआधी चेक करा. जेणेकरुन कार सर्व्हिसिंग सेंटरवर नेण्याआधी सर्व प्रॉब्लेम लक्षात येतील. त्यावर तुम्हाला काम करता येईल. जसे घराबाहेर पडताना तुम्ही कारमधील इंधन चेक करता. तसेच कारमधील प्रॉब्लेमसही लक्षात घ्या.

आवश्यक काम करा

कार व्यवस्थित राहावी आणि त्यात काही बिघाड होऊ नये हे कार सर्व्हिसिंगचे मुख्य उद्दिष्ट आहे. जर तुम्ही कार सर्व्हिसिंग करायला जात आहात तर त्यात आवश्यक ते काम करा. जर तुम्ही गरज नसतानाही जास्त काम केले तर तुमचे पैसे वाया जातील.

Car Maintenance Tips
Best Cooking Oil For Heart : सावधान! जेवणात वापरले जाणारे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com