Breast Cancer : 'या' कारणांमुळे महिलांना होऊ शकतो स्तनाचा कर्करोग, वेळीच व्हा सावध..

बदलेल्या जीवनशैलीनुसार व आपल्या करिअरसाठी लोक दिवसापेक्षा रात्रीचे काम करण्यास अधिक चांगले समजतात.
Breast Cancer
Breast CancerSaam Tv
Published On

Breast Cancer : आजच्या काळात, लोक त्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत घेतात. इतकेच नाही तर ते त्यासाठी तडजोड देखील करण्यास मागेपुढे करत नाही. बदलेल्या जीवनशैलीनुसार व आपल्या करिअरसाठी लोक दिवसापेक्षा रात्रीचे काम करण्यास अधिक चांगले समजतात.

रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करायला पुरुष असो वा महिला किंवा ऑफिसमध्ये काम करायचं असो किंवा घरी, ते अनेकदा रात्रीचे काम करण्यास प्राधान्य देतात. (Latest Marathi News)

काहींना रात्री काम करणे अधिक आरामदायी वाटते ज्याचे अतिरिक्त फायदे देखील होतात परंतु, रात्रीच्या शिफ्टमुळे आपल्या अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. रात्रीच्या वेळी अतिरिक्त काम केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक पटीने वाढतो तसेच ज्या महिला दीर्घकाळ रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींनी असतो. मात्र, या दोघांचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर जाणून घेऊया त्याबद्दल अधिक (Breast Cancer Information in marathi)

Breast Cancer
Breast Cancer in Men : पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो का ? त्याची लक्षणे कशी दिसून येतात

नाइट शिफ्ट आणि स्तनाचा कर्करोग कनेक्शन

रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. यामुळे व्यक्तीला अनेक आरोग्याच्या समस्या होण्याची शक्यता अधिक पटींनी वाढते. या आरोग्य समस्यांपैकी एक म्हणजे स्तनाचा कर्करोग (Cancer). खरं तर, जेव्हा तुम्ही रात्री काम करता तेव्हा तुम्हाच्या शरीरावर प्रकाश पडतो, ज्यामुळे तुमच्या सर्केडियन लयमध्ये अडथळा येतो.

हे प्रोलॅक्टिन, ग्लुकोकोर्टिकोइड्स, अॅड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, कॉर्टिकोलिबेरिन, सेरोटोनिन आणि मेलाटोनिनसह तुमच्या शरीरातील अनेक हार्मोन्सच्या स्राववर देखील परिणाम करते. हे शरीरात मेलाटोनिन संश्लेषणास अडथळा आणते आणि त्यानंतर इस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ होते. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

त्यामुळे धोकाही वाढतो

रात्रीच्या वेळी प्रकाशाच्या संपर्कात येण्याने केवळ सॅर्कडियन लयच बिघडत नाही तर स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता देखील वाढते. उदाहरणार्थ, रात्री काम करणाऱ्या महिलांना (Women) मासिक पाळीचे विकार, प्रजनन क्षमता कमी होणे आणि स्तनपान कमी होण्याची शक्यता असते. इतकंच नाही तर रात्री काम करणा-या महिलाही तणाव कमी करण्यासाठी धूम्रपान करू लागतात. त्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक वाढतो.

Breast Cancer
Health Issue : सकाळच्या वेळी सतत वाजणारा अलार्म ठरु शकतो, आरोग्यास हानिकारक !

संशोधनातही ते सिद्ध झाले आहे

नाईट शिफ्ट आणि कॅन्सरमधील संबंध जाणून घेण्यासाठी जगभरात अनेक संशोधने करण्यात आली आहेत, ज्यामध्ये हे सिद्ध झाले आहे की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्याने अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो.

यामध्ये त्वचेचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांचा समावेश होतो. त्याच वेळी, रिसर्च हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अहवालात हे देखील समोर आले आहे की रात्रीच्या प्रकाशात काम करणे पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त हानिकारक असू शकते.

Breast Cancer
Liver Health : यकृताचे आरोग्य जपायचे आहे ? या पदार्थांचे आहारात सेवन करा

निरोगी राहण्यासाठी काय करावे ?

  • जर तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरपासून वाचवायचे असेल तर तुम्ही काही खास उपाय करू शकता.

  • शक्य असल्यास रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे टाळा.

  • जर रात्री काम करणे आवश्यक असेल तर झोपेशी तडजोड करू नका. दिवसातून किमान 7-8 तासांची झोप घ्या.

  • आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष द्या. सकस आणि संतुलित आहाराने तुम्ही अनेक आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकता.

  • सक्रिय जीवनशैली ठेवा. दिवसातील काही वेळ शारीरिक हालचालींमध्ये घालवण्याची खात्री करा.

Breast Cancer
Diabetes : मधुमेह असणारे 'या' गोड पदार्थांचे सेवन करु शकतात, रक्तातील साखरेची चिंता आता नको !
  • वर्षातून एकदा संपूर्ण शरीर तपासणी करून घ्या. तुमच्या स्तनामध्ये काही बदल दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

  • आजच्या काळात, लोक त्यांच्या करिअरच्या प्रगतीसाठी अधिक मेहनत घेतात. इतकेच नाही तर ते त्यासाठी तडजोड देखील करण्यास मागेपुढे करत नाही. बदलेल्या जीवनशैलीनुसार व आपल्या करिअरसाठी लोक दिवसापेक्षा रात्रीचे काम करण्यास अधिक चांगले समजतात.

  • रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करायला पुरुष असो वा महिला किंवा ऑफिसमध्ये काम करायचं असो किंवा घरी, ते अनेकदा रात्रीचे काम करण्यास प्राधान्य देतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com