Health Issue : सकाळच्या वेळी सतत वाजणारा अलार्म ठरु शकतो, आरोग्यास हानिकारक !

बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्याला स्मार्टफोनची इतकी सवय झाली आहे की, आपल्या उठवण्यासाठी देखील त्याची महत्त्वाची भूमिका आहे.
Health Issue
Health IssueSaam Tv
Published On

Health Issue : आपल्या शरीराला ७ ते ८ तासाची झोप पुरेशी असते. झोप पूर्ण न झाल्यास आपल्याला अनेक समस्या उद्भवू लागतात. डोकेदुखी, मळमळ किंवा सतत झोप येणे यामुळे आपल्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.

बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्याला स्मार्टफोनची (Smartphone) इतकी सवय झाली आहे की, आपल्या उठवण्यासाठी देखील त्याची महत्त्वाची भूमिका आहे. बरेचदा कामाच्या गडबडीमुळे आपण उशिरा झोपतो आणि सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावतो. (Latest Marathi News)

Health Issue
Weight Loss : तज्ज्ञांनी सांगितले, जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती घेतात वजन कमी करण्यासाठी 'हे' औषध; 50 च्या वयातही दिसताय तरुण

हा अलार्म आपल्यासाठी वरदान जरी असला तरी, त्याचे सतत होणारे स्नूझिंग आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. खरं तर, ही आपल्या जीवनातील दैनंदिन क्रिया आहे जी आपल्या झोपण्याच्या गुणवत्तेत व्यत्यय आणते ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

मुंबई येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल मधील पल्मोनरी आणि स्लीप मेडिसिन डॉ. एस.पी. राय यांच्या मते, जेव्हा तुम्ही तुमचे अलार्म घड्याळ स्नूझ करता तेव्हा त्यामुळे झोप तुटते जी आपल्या आरोग्यासाठी (Health) चांगली नसते.

"झोपेचे वेगवेगळे टप्पे आहेत - NREM (नॉन-रॅपिड आय मूव्हमेंट) आणि REM (रॅपिड आय मूव्हमेंट) झोप. जेव्हा आपण झोपतो तेव्हा हळूहळू झोपेच्या हलक्या टप्प्यांपासून झोपेच्या खोल टप्प्यांकडे जातो, विशेषत: REM झोप ज्या दरम्यान आपले स्नायू पूर्ण असतात. ज्याला पुनर्संचयित झोप देखील म्हणतात," डॉ राय म्हणाले.

Health Issue
Sleeping Position : तुम्ही कोणत्या कुशीवर झोपताय ? तज्ज्ञ सांगताय त्याच्या अनेक आजारांबद्दल

झोपेचे चक्र साधारणतः 90 मिनिटे चालते आणि रात्री 4-6 वेळा पुनरावृत्ती होते. "जेव्हा आपण स्नूझ करतो, तेव्हा आपण REM स्लीप (ड्रीम स्लीप) मध्ये व्यत्यय आणतो, जी एक पुनर्संचयित झोपेची स्थिती आहे. केवळ 5 ते 10 मिनिटे स्नूझचा वेळ पुनर्संचयित झोपेसाठी पुरेसा नसतो, परंतु व्यत्यय आपल्या हृदयाची गती आणि रक्तदाब वाढवू शकतो, "

मग प्रत्येक सकाळच्या वेक-अप कॉलसाठी त्यांच्या अलार्मवर अवलंबून राहणे कसे थांबवायचे? सतत स्नूझ करुन स्वत:ला उठवणे हे चुकीचे आहे. त्यासाठी आरोग्याच्या अनेक सवयी बदलायला हव्या. " डॉ राय यांनी सल्ला दिला, लोकांनी कॅफीन घेणे टाळले पाहिजे आणि त्याऐवजी, "झोपण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात द्रव प्या."

Health Issue
Sleeping After Lunch In Office : दुपारी जेवल्यानंतर ऑफिसमध्ये झोप येते ? काम करण्याची इच्छा होत नाही ? या गोष्टी करुन पहा

पुढे ते म्हणाले की, फोनवर रात्री उशिरा ब्राउझिंगमुळे झोपेचा त्रास होतो. झोपण्याच्या एक तास आधी इंटरनेट ब्राउझिंग आणि सोशल मीडियावरून आपण स्वत: ला अनप्लग करायला हवे. रिअॅलिस्टिक वेळेसाठी तुमचा अलार्म सेट करा. तुम्ही तुमचे अलार्म घड्याळ खोलीभर हलवू शकता. तुमचे अलार्म स्नूझ करत राहिल्यास तुमची झोप होणार नाही त्यासाठी वेळेत झोप घेणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com