Sleeping After Lunch In Office
Sleeping After Lunch In OfficeOffice

Sleeping After Lunch In Office : दुपारी जेवल्यानंतर ऑफिसमध्ये झोप येते ? काम करण्याची इच्छा होत नाही ? या गोष्टी करुन पहा

ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्याला झोप येते तर या टिप्स फॉलो करा.
Published on

Sleeping After Lunch In Office : खरेतर पोटभरुन जेवल्यानंतर आपल्याला आळस व सुस्ती चढते व त्यानंतर आपल्या झोप येऊ लागते. अशावेळी आपण ऑफिसमध्ये असू तर आपले काही खरे नाही !

काही वेळा आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर काही काळानंतर आपल्याला कंटाळा येतो व झोप येऊ लागते. सतत झोप येत असल्यामुळे आपले काम देखील होत नाही. कामाचा ताण व येणारी झोप यामुळे आपली अधिक चिडचिड होते.

काम करताना येणाऱ्या झोपेच्या मागची कारणे अधिक आहेत. ज्याचा आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यासाठी आपल्याला ऑफिसमध्ये (Office) झोप आल्यानंतर आपण काय करायला हवे हे जाणून घेऊया.

१. गाणी ऐकणे -

आपल्या ऑफिसमध्ये झोप येत असेल तर आपण गाणी ऐकायला हवी. ज्यामुळे आपली झोप उडण्याचा प्रयत्न होईल. तसेच गाणी अशाप्रकारे निवडा ज्यामुळे आपल्या फ्रेश वाटेल.

Sleeping After Lunch In Office
Curry Leaves Benefits : या आजारांपासून संरक्षण करेल फोडणीतला कढीपत्ता ! जाणून घ्या, त्याचे फायदे

२. कॉफी प्या -

कॉफीमध्ये कॅफीन अधिक प्रमाणात आढळते त्यामुळे कॉफीचे (Coffee) सेवन केल्यास झोप उडण्यास मदत होते. परंतु, सतत चहा किंवा कॉफीचे सेवन केल्याने आपल्याला इतर आजारांदेखील बळी पडावे लागते, त्यासाठी त्याचे सेवन प्रमाणात करायला हवे.

३. सक्रीय रहा -

ऑफिसमध्ये व्यायाम करण्याचा विचार केला तर ते शक्य नाही. पण, झोप आल्यावर बसून राहाणे हे योग्य नाही. म्हणून जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी थोडा ब्रेक घ्या. शरीराला डिहायड्रेट होऊ देऊ नका, पाणी प्या. यामुळे तुम्हाला ताजे आणि सक्रिय राहण्यास मदत होईल.

४. पुरेशी झोप घ्या-

पुरेशी झोप न मिळाल्यास दिवसभर काम करता येत नाही. शरीरात थकवा कायम राहतो, तर कधी डोकेही दुखते. आठवड्याच्या शेवटी ताजेतवाने वाटण्याऐवजी आपण थकलेले असतो. त्यामुळे आपल्याला दिवसभरात कधीही झोप येऊ लागते. त्यामुळे जर आपण पुरेशी झोप घेत नसू तर आपल्याला चांगली झोप घेण्याची सवय लावायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com