Diabetes : मधुमेही रुग्णांसाठी कोणत्याही पदार्थाचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. त्यात गोड हा पदार्थ त्याच्यासाठी विषापेक्षा कमी नाही, कारण त्यामुळे अचानक साखरेची (Sugar) पातळी वाढते, ज्यामुळे तब्येत बिघडू शकते.
नवीन असो वा जुने, मधुमेहींना (Diabetes) गोड सतत खावेसे वाटते. त्यात जर आपल्या हा पदार्थ खाऊ नको सांगितल्यावर तर तो पदार्थ अधिक खाण्यात रस असतो. परंतु, बहुतेक प्रसंगी ते मनाचा ठोका चुकवतात.
अशावेळी काही पदार्थ असे आहेत ज्याचे सेवन केल्याने त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे सुरळीत राहू शकते जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत.
मधुमेहाचे रुग्ण हे गोड पदार्थ खाऊ शकतात
१. दही
दही हे मधुमेहींसाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही या दह्यात बेरी, सफरचंद, ड्रायफ्रुट्स आणि इतर फळे घालून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला पोट भरलेले राहिल आणि साखरेची पातळी वाढणार नाही.
२. ओट्स
चांगल्या आरोग्यासाठी नाश्त्यामध्ये दलिया खाण्याची शिफारस केली जाते, परंतु ती गोड डिश नाही, त्यात थोडा गोडवा आणण्यासाठी तुम्ही दालचिनी, नारळ पावडर आणि मॅश केलेले केळे घालून मधुमेहाच्या रुग्णांना खाऊ घालू शकता.
३. डार्क चॉकलेट
चॉकलेटचे आकर्षण प्रत्येकाला असे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला पण, हे चॉकलेट मधुमेही रुग्ण खाऊ शकत नाही. कारण साखरेच्या प्रमाणामुळे तब्येत बिघडू शकते, पण तुम्ही शुगर फ्री डार्क चॉकलेट खाऊ शकता, त्यात मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. साखरेची पातळी नियंत्रित करू शकते.
४. चिया सीड्स पुडिंग
चिया बियांना सामान्यतः सब्जा बिया देखील म्हणतात, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जर आपण पौष्टिकतेबद्दल बोललो तर त्यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. मधुमेहाचे रुग्ण चिया बियांच्या मदतीने शुगर फ्री पुडिंग तयार करून खाऊ शकतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.