Diabetes Control Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी रोज सकाळी 'हे' काम करा, दिवसभर राहिल साखरेचे पातळी नियंत्रणात

खाण्यापिण्याची बदलेली जीवनशैली, ताणतणाव, आनुवंशिकता यामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
Diabetes Control Tips
Diabetes Control TipsSaam Tv
Published On

Diabetes Control Tips : खाण्यापिण्याची बदलेली जीवनशैली, ताणतणाव, आनुवंशिकता यामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. हा आजार अचानक होत नाही, तो हळूहळू शरीरात जातो.

मधुमेहाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब करायला हवा. यासाठी औषधांची गरज नाही. त्यासाठी दैनंदिन जीवनशैलीत व आहाराने साखरेचे पातळी नियंत्रणात आणू शकतात. केवळ आहारात बदल केले तर रक्तातील साखर कमी होणार नाही, परंतु, तुम्हाला सकाळी थोडा व्यायाम करावा लागेल जेणेकरून तुमची साखरेची पातळी नियंत्रित राहील.

Diabetes Control Tips
Diabetes : तज्ज्ञांनी सांगितले, मधुमेह असणाऱ्यांना मिळेल आता आराम; करा 'या' रोपाचे सेवन !

हा व्यायाम फक्त सकाळी करा

१. औषध घेऊन सुध्दा साखर (Sugar) नियंत्रणात राहत नसेल तर आपण हा व्यायाम करायला हवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त सकाळीच व्यायाम करता, त्याचा प्रभाव जास्त असतो. संतुलित आहार आणि व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

२. चालण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते तसेच, मधुमेहामुळे होणारे इतर रोग देखील टाळते. दुसरीकडे, जर तुम्ही प्री-डायबेटिक असाल, तर वेगाने चालणे देखील हा आजार होण्यापासून रोखू शकते. जर तुम्ही सकाळी किमान १५ ते २० मिनिटे चालत असाल तर तुम्हाला फायदा होईल.

Diabetes Control Tips
Diabetes Diet Plan : वाढत्या साखरेच्या पातळीला नियंत्रणात ठेवायचे आहे ? तर, ताटात ठेवू नका 'हे' पदार्थ

३. सकाळी सायकलिंग करा, किमान १५ मिनिटे सायकल चालवल्याने तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे केवळ शुगर लेव्हलच नाही तर इतर अनेक आजार बरे होतात.

४. सकाळी एरोबिक्स केल्याने मधुमेही (Diabetes) बरा होतो. दररोज सकाळी किमान ३० मिनिटे एरोबिक नृत्य करा आणि आठवड्यातून किमान पाच दिवस करा. हळूहळू तुमचे शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू लागेल.

५. १० ते १५ मिनिटे कपाल भारती आणि अनुलोम विलोम सारखे प्राणायाम केल्याने श्वासोच्छवासाचा व्यायाम होतो आणि तुमचा मधुमेह बरा होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, पोहणे हे देखील खूप उपयुक्त आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com