Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

BP Control: हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी सांगितलेले 4 सोपे आणि नैसर्गिक उपाय जाणून घ्या आणि हृदय निरोगी ठेवा.
foods to lower blood pressure
high blood pressure dietgoogle
Published On

हाय ब्लड प्रेशर ही आजकालच्या जीवनशैलीमुळे वाढणारी एक कॉमन समस्या झाली आहे. कारण लोक धकाधकीच्या जीवनात जगत असले तरी त्यांना मोठ्या गाड्यांमधून तांसतास फिरणं, व्यायाम करायला आळस येणं आणि मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन खाणं हे खूप आवडायला लागलं आहे. त्यामुळे त्यांना कमी वयातच जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

काही आजार हे सायलेंट किलर असतात. म्हणजेच त्याची लक्षणं सुरुवातीला जाणवत नाहीत आणि थेट मोठ्या स्वरुपात ती आढळतात. जी प्रत्येकाच्या जीवासाठी धोक्याची असतात. असाच BP चा आजार आहे. त्यामुळे तुम्हाला हेल्दी राहायचं असेल किंवा याचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करा. ज्या हृदयरोग उपचाराचा 20 वर्षांहून जास्त अनुभव असलेले बोर्ड-प्रमाणित कार्डिओलॉजिस्ट डॉ. संजय भोजराज यांनी दिल्या आहेत.

foods to lower blood pressure
Chanakya Niti: ऑफीसमध्ये कधी बोलायचं अन् कधी शांत राहायचं? चाणक्यांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

तज्ज्ञ म्हणतात, तुम्हाला ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुमच्या आहाराकडे विशष लक्ष दिले पाहिजे. यांने फक्त औषधांवर अवलंबून न राहता तुम्ही रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करू शकता.

१. ॲव्होकाडोचे सेवन

ॲव्होकॅडो हा रक्तदाब कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात. पोटॅशियम शरीरातील सोडियमचं प्रमाण संतुलित ठेवून रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी करतं, तर मॅग्नेशियम रक्तवाहिन्या सैल करतं.

२. केळींचे सेवन

केळी हा सहज उपलब्ध सोपा पर्याय आहे. त्यातले पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देण्याचं काम करतं. त्यामुळे हृदयावरील ताण कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. नाश्त्यात, ओट्ससोबत किंवा साधा स्नॅक म्हणून केळी खाणं फायदेशीर ठरतं.

३. हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या रक्तदाबासाठी खूप फायदेशीर असतात. पालक, मेथी यांसारख्या भाज्यांमध्ये नायट्रेट्स असतात. याने रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते. त्यामुळे रक्तदाब कमी होतो.

४. लसणाचे सेवन

लसूण पारंपरिक औषधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. लसणातील अ‍ॅलिसिनसारखी संयुगं रक्तवाहिन्या सैल करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. लसणाचे रोज सेवन केल्याने रक्तदाब हळूहळू कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, औषधांवर अवलंबून न राहता योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी लावल्याने तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

foods to lower blood pressure
Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com