Devendra Fadnavis: PFI हा एक सायलेंट किलर; केंद्रानं बंदी घातल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

केंद्रातील मोदी सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर मोठी कारवाई केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis saam tv

सुशांत सावंत

मुंबई - केंद्रातील मोदी सरकारने (Central Government) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर मोठी कारवाई केली आहे. पीएफआय संघटनेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पीएफआयवर घातलेली बंद योग्य असून महाराष्ट्रातही आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल अशी माहिती दिली आहे.

सर्व गोष्टीचे पुरावे उपलब्ध असल्यामुळे केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात देखील या लोकांनी विविध ठिकाणी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. एक मानवी चेहरा दाखवायचा आणि पाठीमागून कृत्य करायचे . यात वेगवेगळे लोक आहेत त्यांच्या सहभागानुसार कारवाई होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणालं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या लोक आपल्या देशाला खिळखिळ करण्याचा प्रयत्न करतात तसेच काही लोक देशात तेढ निर्माण करण्याचे काम करत होते त्यात पीएफआय फार पुढे होत. आधी केरळ सरकाने पीएफआयवर बंदी घाला अशी मागणी केली होती त्यानंतर विविध राज्यातून ही मागणी होत होती. पीएफआयशी संबधित इतर 6 संस्थांवरही बंदी घालण्यात आली आहे. या संस्थांचे आणखी काही कनेक्शन आहेत का? त्याचबरोबर बाकी त्यांच्या संस्थांचा इतर संस्थांशी संबंध आहे का? किंवा पैशाचे काही व्यवहार झाले आहेत? त्यानंतरही दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री म्हणालेत.

Devendra Fadnavis
Wardha: विनाकारण साखळी ओढणे पडले महागात; नऊ महिन्यांत १०५ प्रकरण दाखल

दरम्यान, PFI वरील बंदीनंतर काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी RSS वर देखील बंदी घाला अशी मागणी केली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, असे मूर्खां सारखे बोलणारे खूप आहेत आरएसएस बाबत एक तरी प्रकार असा पहिला आहे का? ज्यांच्याकडे अक्कल कमी आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही असा टोला फडणवीस यांनी काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांना नाव न घेता लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com